|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » फोरम संमेलनात महिला प्रतिनिधींच्या टक्क्यांत वाढ

फोरम संमेलनात महिला प्रतिनिधींच्या टक्क्यांत वाढ 

सलग पाचव्या वर्षातही महिलांचा टक्का वधारलेला : भारतीय शिष्टमंडळात 13 टक्के महिलांचा सहभाग

वृत्तसंस्था/ दावोस

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम(डब्ल्यूईएफ) यांनी यंदा दावोस या ठिकाणी संमेलनाचे आयोजन केले आहे. यामध्ये जगभरातील व्यवसायीकासह अन्य क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱया महिलांनी जवळपास 22 टक्के आपला सहभाग नोंदवला आहे. एकूण 3 हजार प्रतिनिधींमध्ये 696 महिलांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षातील महिलांच्या सहभागाचा आकडा पाहता तो प्रतिवर्षी वधारत असल्याची नोंद डब्ल्यूईएफ यांच्याकडून करण्यात आली आहे.

फोरमच्या संमेलनामध्ये 119 देशातील शिष्टमंडळांनी सहभाग घेतला आहे. नार्वेमधील प्रतिनिधीची संख्या सर्वाधिक म्हणजे 37 टक्के आहे. त्याबरोबर भारतीय महिलांचा सहभाग 13.2 असल्याची नोंद करण्यात आली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महिला प्रतिनिधींनी सलग तिसऱया वर्षातही फायदा घेतला आहे. यावेळी सात सदस्यांमधील चार महिला सदस्य असल्याचे स्पष्टीकरण ही यावेळी दिले आहे. इराकची बासिमा आणि स्वीडनमधील नोरा आणि जपानची अकीरा सकानो तर अमेरिकेतील जूलिया व स्वीडनची बरोबुला यांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात आले.

संमेलन 25 जानेवारीपर्यंत

प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येणाऱया वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जगभरातील व्यवसायातील प्रतिनिधी सरकारी अधिकारी आणि अन्य क्षेत्रात कार्यरत असणाऱया मान्यवर यात सहभाग घेतात. हा कार्यक्रम  25 जानेवरी 2019 पर्यंत सुरु राहणार असल्याचे नमूद केले आहे.

संकल्पना

सदर कार्यक्रमात ‘चौथी औद्योगिक क्रांती’ या संकल्पनेखाली हा कार्यक्रम पार संपन्न होत असल्याने यांत अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक औद्योगिक विषयावर चर्चा करण्यात जाणार आहेत.

महिलांचा सर्वाधिक समावेश

देश…… समावेश टक्के

नार्वे…………….. 37

केनिया………. 36.4

ऑस्ट्रेलिया…… 33.3

फ्रान्स………… 31.6

अमेरिका            31.1

5 महत्वाची क्षेत्र व महिला (टक्क्यात )

सार्वजकि क्षेत्र. 29.2

व्यावसायिक.. 29.1

आयटी………. 28.6

मिडीया, मंनोरंजन 27.5

अन्न, पेये व रिटेल 23.6