|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सोने-चांदी दागिने चोरी प्रकरणी दोघे ताब्यात

सोने-चांदी दागिने चोरी प्रकरणी दोघे ताब्यात 

बेळगाव / प्रतिनिधी

शिवबसवनगर येथील एका घरात सोन्या-चांदीचे दागिने चोरल्या प्रकरणी माळमारूती पोलीसांनी आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. या चोरी प्रकरणी रूक्मिणी नगर येथील मंजुनाथ कल्लाप्पा हलगत्ती (वय 21) आणि रामदूर्ग अरेबेंची तांडामधील प्रशांत लक्ष्मण राठोड (वय 22) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून 1.58 लाख किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली बजाज डिस्कवर ही दुचाकी असे एकूण 1 लाख 73 हजार 725 रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी, माळमारूतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी सोमवारी ही कारवाई केली.

शिवबसवनगर येथील श्रीमती लक्ष्मी उमेश धारप्पण्णावर यांच्या घरी दि. 15 जानेवारी रोजी चोरीचा हा प्रकार घडला होता. यामध्ये चोरटय़ांनी घरातून सुमारे 1.58 लाख किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते. सदर आरोपींना सोमवारी ताब्यात घेण्यात आले. निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली उप निरीक्षक आर. बी. सौदागर, ए. आर. दुंडगी, के. जी. मुजावर, एम. जे. कुरेर, डी. सी. सागर, सी. आय. चिगरी, एल. एम. मुशापुरे, एम. बी. अडवी आणि अन्य पोलीस कर्मचाऱयांनी या कारवाईत भाग घेतला होता.