|Monday, May 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मारिहाळ दुहेरी खुनाचा छडा 48 तासात

मारिहाळ दुहेरी खुनाचा छडा 48 तासात 

बेळगाव / प्रतिनिधी

मारिहाळ येथील दुहेरी खुनातील मारेकऱयांचा शोध लावण्यात मारिहाळ पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी तिघा आरोपींना मंगळवारी ताब्यात घेतले. शिवानंद निंगप्पा करवीनकोप्प (वय 23), महेश बसवराज नगारी (वय 20) आणि निंगप्पा बसवराज बळळोडी (वय 27) सर्व रा. मारिहाळ अशी मारेकऱयांची नावे आहेत. सोमवारी तिघा संशयित आरोपींना सुळेभावी रेल्वे स्थानकानजीक ताब्यात घेण्यात आले. जमिनीचा वाद तसेच पैशाच्या देवाण-घेवाणीतून हे खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर दुहेरी खून प्रकरणाचा तपास 48 तासात लावून मारेकऱयांना जेरबंद केल्याबद्दल पोलीस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा यांनी पोलीस अधिकाऱयांचे कौतुक केले आहे.

 रविवारी सकाळी हा भीषण खुनाचा प्रकार उघडकीस आला होता. शेतात नांगरण्यासाठी गेलेल्या मारिहाळ येथील बसणगौडा सोमरेड्डी पाटील ऊर्फ बदामी (वय 25) आणि पत्र्याप्पा मल्लाप्पा मल्लण्णावर (वय 40) या तरुणांचा भीषण खून करण्यात आला होता. आरोपींनी खून करून त्यांचे मोबाईलही लांबविले होते. तसेच खुनाचे कोणतेही धागेदोरे मागे सोडले नव्हते. सदर प्रकरण मारिहाळ पोलीस स्थानकात दाखल झाले होते. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, महालिंग नंदगावी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणचे एसीपी भालचंद्र डी. एस. मारिहाळचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंण्णूर आणि त्यांच्या सहकाऱयांनी तपास करत केवळ 48 तासातच मारेकऱयांचा शोध घेतला आहे.

मंगळवारी सकाळी सुळेभावी रेल्वेस्थानकाजवळ तिघा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता, खून केल्याचे त्यांनी कबुल केले आहे. आरोपींनी  बसणगौडा पाटील तसेच पत्र्याप्पा मल्लण्णावर यांच्याशी वैर असल्याचे तसेच पैशाची देवाण-घेवाण तसेच आरोपी निंगाप्पा बळ्ळोडी यांच्या परसातील जागेबाबत असलेल्या वादावरून हा खुनाचा प्रकार झाला आहे. पोलिसांनी आरोपीकडून खुनासाठी वापरलेली शस्त्रे आणि मोबाईल जप्त केले असून, आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आले.

 

Related posts: