|Friday, July 19, 2019
You are here: Home » उद्योग » भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी शहरीकरण आवश्यक : कांत

भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी शहरीकरण आवश्यक : कांत 

दावोस :

 भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूती व वृद्धी करण्यासाठी आगामी काळता शहरीकरणावर भर देण्याची गरज निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी केले आहे. अनेक क्षेत्रांमध्ये सातत्यपुर्ण होत असणाऱया सुधारणा आणि नवीन तयार करण्यात येणाऱया योजना यांचा फायदा आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यास उपयोगी पडणार असल्याचे मत वर्ल्ड फोरमच्या कार्यक्रम प्रसंगी कांत यांनी नोंदवले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून नुकताच सादर करण्यात आलेल्या अनुमानातून भारताचा आर्थिक विकासदर येत्या काळात 7.5 राहणार असल्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. म्हणजे भारत विकासात मोठी झेप घेत असल्याचे मुद्दे नोंदवण्यात येत आहेत. यात सर्वात मोठे क्षेत्र म्हणजे शहरीकरण होय ते येत्या काळात सुधारणात्मक वातावरण तयार करत बदल करण्याची गरज निर्माण होणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी आहे.

स्मार्टसिटी योजनेला चालना

भारताची अर्थव्यवस्था येत्या काळात शहरीकरणाला चालना देणार असून त्यासाठी स्मार्ट सिटी या उपक्रमाला सरकारी पातळीवर व खासगी पातळीवर उभारी देण्यासाठी चालना देण्याकरीत विकासात्मक घटक उपयोगी पडणार असल्याचे अनुमान यादरम्यान मांडण्यात आली आहेत. देशातील एकूण 100 हून अधिक शहरात अत्यधुनिक यंत्रणा व उन्य सुविधा उभारण्यात येणार असून त्याचा नफा भारतीय अर्थव्यस्थेला आगामी काळात चालना देण्यासाठीच होणार आहे.