|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरजेत तब्बल 325 फुटाच्या तिरंगा ध्वजाची एकात्मता यात्रा

मिरजेत तब्बल 325 फुटाच्या तिरंगा ध्वजाची एकात्मता यात्रा 

प्रतिनिधी/ मिरज

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मिरज शाखेच्या वतीने तब्बल 325 फुटी तिरंगा ध्वजासहीत शहरातील प्रमुख मार्गावरुन ‘एकात्मता तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. यात्रेत मान्यवरांसह शहरातील 15 शाळा आणि महाविद्यालयातील सुमारे सातशे विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने युवक सप्ताहानि†िमत्त सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी शहरातील भाऊराव चौकातून या यात्रेस प्रारंभ झाला. त्याचे उद्घाटन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा प्रमुख वाणी सर यांच्या हस्ते प्रा. मोहन वनखंडे, भाजपाचे प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, नगरसेवक निरंजन आवटी, पांडूरंग कोरे, शिवाजी दुर्वे, बाबासाहेब आळतेकर, गजेंद्र कुल्लोळी, अजिंक्य हंबर, लठ्ठे पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य ओमासे सर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाले होते.

भाऊराव चौकातून सुरूवात झालेल्या यात्रेच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद आणि सुभाषचंद्र बोस यांची तैलचित्रे होती. याशिवाय भारतमातेची वेशभूषा परिधान केलेले अनेक विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. यात्रेत शहरातील ज्युबिली कन्या शाळा, विद्या मंदिर प्रशाला, लठ्ठे पॉलिटेक्निक, कन्या महाविद्यालय, डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, गुलाबराव पाटील महाविद्यालय यांच्यासह 15 शाळा आणि महाविद्यालयातील सुमारे सातशेहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभाग झाल्या होत्या. देशातील विघातक शक्तीविरुध्द एकजूट व जागरुकता निर्माण करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयातील तरुण हा फक्त इतिहास वाचण्यासाठी नसतो. तो इतिहास घडविण्यासाठीही असतो. देशाला भारतमाता की जय म्हणत परिवर्तन घडवून आणणारा तरुण हवा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री साधना वैराळे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना केले.

कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश सहमंत्री प्रविण जाधव, प्रथमेश परुळेकर, ऋषिकेश कुलकर्णी, बाहुबली छत्रे, शुभम शेटे, पुष्पक चौगुले, समेध चौगुले, प्रफुल्ल पाटील, ओंकार गुरव, सुधीर रसाळ, उत्कर्ष रसाळ, विवेक मोरे, संघर्ष वनखंडे यांनी केले होते. सुत्रसंचलन कु. स्नेहा कुंडले तर आभार मिरजनगर मंत्री बाहुबली छत्रे यांनी मानले. प्रमुख मार्गावरील या यात्रेने मिरजकरांचे लक्ष मात्र वेधून घेतले होते.