|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विविध ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

विविध ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन 

बेळगाव  / प्रतिनिधी

सीमावासियांचे आधारस्तंभ हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब यांची जयंती शहरातील विविध संघटना व मंडळांच्यावतीने साजरी केली. बाळासाहेबांचे व सीमाभागाचे एक अतूट नाते होते. त्यामुळेच त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केला. तसेच सीमालढय़ात त्यांचे सक्रीय योगदान होते. त्यामुळे त्यांची आठवण सीमावासिय नेहमीच काढत असतात. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सीमाभाग शिवसेना

रामलिंगखिंड गल्ली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली. यानिमित्त मिठाई वाटप, ज्ये÷ांचा सत्कार केला.

जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर व संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन केले. यावेळी ऍड. शामसुंदर पत्तार, उप जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, दिलीप बैलूरकर, सचिन गोरले, विजय मुरकुटे, प्रविण तेजम, प्रकाश राऊत, राजकुमार बोकडे, वामनराव पाटील, रामभाऊ शिंदोळकर, राजू तुडयेकर, वैजनाथ भोगण, महेश टंकसाळी, बाळू भादवणकर, भीमराव सुतार, बाळासाहेब डंगरले, पिराजी शिंदे यासह इतर कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेतर्फे ज्ये÷ांचा सत्कार

बेळगाव जिल्हा शिवसेना (सीमाभाग) यांच्यावतीने बुधवारी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती साजरी केली. रामदेव गल्ली येथील राम मंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. अशोक पोतदार उपस्थित होते.

प्रारंभी उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांनी प्रास्ताविक केले. अशोक पोतदार यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी बापट गल्ली येथील ज्ये÷ व्यक्तींचा सत्कार केला. दशरथ मिसाळ, सुमित्रा मिसाळ, गोपाळराव केसरकर, आशा केसरकर, मारुती मुरकुटे, शोभा मुरकुटे, मनोहर नरगुंदकर, रेणुका नरगुंदकर, महादेव किल्लेकर, सुनंदा किल्लेकर यासह 20 जणांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना कार्यकर्ते राहुल भोसले, मयुरेश काकतकर, उदय पाटील, राम जाधव, नरेश निलजकर, प्रताप मोहीते, प्रताप मोहीते, रोहीत मुरकुटे, जितेंद्र घुमटे यासह नागरिक उपस्थित होते.

म. ए. युवा समितीतर्फे शहापूर येथे कार्यक्रम

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शहापूर येथील नाथ पै चौक येथे साजरी केली. प्रारंभी अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, उपाध्यक्ष संतोष कृष्णाचे, माजी नगरसेवक नेताजी जाधव यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले.

यावेळी महादेव पाटील, श्रीकांत कदम, बाबू पावशे, अंकुश केसरकर, किरण हुद्दार, विजय जाधव, विजय होनगेकर, निर्मळ धाडवे, राहुल हुलजी, सचिन केळवेकर, वैजनाथ चौगुले, उमेश बिर्जे, सुनील बाडीवाले, प्रशांत भादवणकर, वासू सामजी, सदानंद कदम, विश्वजीत चौधरी, मनोहर हुंदरे, सतीश गावडोजी, दिनकर चव्हाण, दिनकर पवार यासह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: