|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रिंगरोड प्रस्तावाविरोधात 655 शेतकऱयांच्या हरकती

रिंगरोड प्रस्तावाविरोधात 655 शेतकऱयांच्या हरकती 

शेवटच्या दिवशी 28 शेतकऱयांनी नोंदविल्या हरकती

प्रतिनिधी/ बेळगाव

रिंगरोडसंदर्भात आक्षेप नोंदविण्याचा शेवटचा दिवस बुधवारी होता. त्या दिवशी केवळ 28 शेतकऱयांनी आक्षेप नोंदविला आहे. आतापर्यंत एकूण 655 शेतकऱयांनी आक्षेप नोंदविला आहे. शिवबसवनगर येथील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकार 4 ए यांच्याकडे या हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.

रिंगरोडसाठी बेळगाव तालुक्मयातील तब्बल 427 हेक्टर जमीन जाणार आहे. त्या विरोधात शेतकऱयांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. हरकती नोंदविण्याचे आवाहन प्राधिकारकडून करण्यात आले होते. त्यानुसार शेतकऱयांनी गेल्या आठ दिवसांपासून आपल्या हरकती नोंदविल्या आहेत. रस्त्यावरील लढाईबरोबरच न्यायालयीन लढाई लढण्यासाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही रिंगरोडसाठी जमीन देणार नाही, असा निर्धार शेतकऱयांनी व्यक्त केला आहे.

आता आक्षेप नोंदविल्यानंतर त्या विरोधात न्यायालयातही शेतकरी याचिका दाखल करणार आहेत. बहुसंख्य शेतकऱयांनी आपले आक्षेप थेट जावून नोंदविले आहेत. काही उताऱयांवर 10 ते 15 नावे आहेत. त्या शेतकऱयांनीही आपल्या हरकती नोंदविल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या उपविभागाचे व्यवस्थापक आर. ए. गस्ती यांनी या हरकती नोंदवून घेतल्या आहेत.

शेतकऱयांनी आता लढा उभारणे गरजेचे

प्रस्तावित रिंगरोड हा तिबार पिकी जमिनीतून जात आहे. त्यामुळे ज्या जमिनी पिकावू नाहीत, त्यामधून रिंगरोड करावा, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे. सध्या हरकती नोंदविल्या असल्या तरी प्राधिकरणाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सॅटेलाईटच्या माध्यमातून हा रिंगरोड नियोजित करण्यात आला आहे. आता यानंतर शेतकऱयांना वैयक्तिक नोटिसा प्राधिकार पाठविण्याची शक्मयता आहे. सध्या काही वृत्तपत्रांमधून ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱयांनी आता लढा उभारणे गरजेचे आहे.