|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » विंडीजची कर्णधार टेलरने पाक दौरा सोडला

विंडीजची कर्णधार टेलरने पाक दौरा सोडला 

वृत्तसंस्था / सेंट जोन्स

चालू महिन्यांच्या अखेरीस विंडीजचा महिला क्रिकेट संघ पाकमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. विंडीज महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्टिफेनी टेलरने पाकमधील सुरक्षा व्यवस्थेच्या कारणावरून या दौऱयात सहभागी होणार नसल्याचे विंडीज क्रिकेट मंडळाला कळविले आहे.

2016 साली विंडीजच्या महिला क्रिकेट संघाने आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. आता विंडीजचा महिला क्रिकेट संघ पाकमध्ये टी-20 चे तीन सामने खेळणार आहे. हे सामने कराचीत 31 जानेवारी, 1 आणि 3 फेब्रुवारीला होणार आहेत. या आगामी मालिकेत विंडीज संघाला कर्णधार टेलरची उणीव निश्चितच भासेल. आता टेलरच्या जागी मेरीसा ऍग्युलेराची विंडीज महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या नोव्हेंबरमध्ये विंडीजच्या महिला क्रिकेट संघाला आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.