|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » ज्येष्ठ साहित्यिका कृष्णा सोबती यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिका कृष्णा सोबती यांचे निधन 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

स्त्रियाचे भावविश्व, वेदना, स्वाभिमान आपल्या साहित्यांतून सशक्तपणे मांडणाऱया सुप्रसिद्ध साहित्यका आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखिका कृष्णा सोबती यांचे आज निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या.

सफदरजंग रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.कृष्णा सोबती यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1925 रोजी पाकिस्तानमधील एका गावात झाला. 1950मध्ये ‘कहानी लामा’पासून त्यांनी आपल्या साहित्यकि प्रवासाला सुरुवात केली. ‘मित्रो मरजानी’, ’डारे से बिछडी’, ’जिंदगीनामा’, ’सूरजमुखी अंधेरे के’, ’दिलो दानिश’, ’समय सरगम’ आदी साहित्यकृतींची दखल घेण्यात आली होती. ’समय सरगम’ आणि ’जिंदगीनामा’ या साहित्यकृती हिंदी साहित्यातील कालातीत साहित्य मानल्या जातात. ‘जिंदगीनामा’साठी 1980 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर, 2017 मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले.