|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » जेट एअरवेजने कर्जे शेअरमध्ये परिवर्तन करण्याची मागणी

जेट एअरवेजने कर्जे शेअरमध्ये परिवर्तन करण्याची मागणी 

जेटची कंपनी बोर्डाकडे मंजुरीसाठी मागणी

मुंबई :

आर्थिक संकटाचा सामना करणाऱया जेट एअरवेज कंपनीने नवीन गुंतवणूक आणि सध्याचे असणारे कर्जाच्या बदलल्यात शेअर्स सादर करण्याची मागणी केली आहे. त्यात बँकांची मुख्य हिस्सेदारी देण्यासाठीची योजना तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी कंपनीने 21 फेब्रुवारीला शेअरधारकांसाठी सभा आयोजित केली आहे. त्फात 2 हजार कोटी ते अतिरीक्त शेअर सादर करणे व 25 हजार कोटी अंतिम टप्प्यापर्यत कर्ज घेण्यासाठी कंपनी बोर्डाकडून मंजुरी दिली आहे.

शेअर धारकांची संख्या वाढवत 68 कोटीची शक्यता

कंपनीच्या शेअर्सची संख्या वाढवण्यासाठी कंपनी प्रयत्न करणार आहे. त्यात शेअरधारकाची संख्या 18 कोटी वरुन 68 कोटीपर्यंत घेणार असल्याची घोषणा कंपनीकडून केली आहे. त्यात जेटएअरवेजने शेअर्सच्या संख्येत वाढ करत 152 काटी करण्यात यावी व त्याला मंजुरी देण्यात येण्यासाठी कंपनी बोर्डाकडे मागणी केली आहे.

जेटवर 10 हजार 900 कोटीचे कर्ज

आर्थिक संकटाचा सामना करणाऱया जेटएअरवेजवर जवळपास 10 हजार 900 कोटी रुपयाचे ओझे आहे, तय मागील डिसेंबरमध्ये कर्ज फेडण्याची बँकांची मुदत होती परंतु त्यात जादा मुदत घेऊन ती मार्च शेवटपर्यंत 1 हजार 700 कोटी रुपये कर्ज फेडण्याचा आदेश देण्यात आला आहे.