|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » मोदी सरकारने महागाईचे कंबरडे मोडले : गोयल

मोदी सरकारने महागाईचे कंबरडे मोडले : गोयल 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

 मोदी सरकारच्या कारकिर्दीत महागाईचे कंबरडे मोडल्याचा दावा हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर करताना शुक्रवारी केला.

 गोयल म्हणाले, या सरकारने सर्वसामान्यांना महागाईची झळ बसू दिलेली नाही. महागाईचा दर सरकारने दोन टक्क्यांपर्यंत खाली आणत सर्वांनाच दिलासा दिला आहे. महागाईचे कंबरडे मोडण्याची मोदी सरकारची ही कामगार महत्त्वपूर्ण आहे.