|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही : नितीन गडकरी

मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही : नितीन गडकरी 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत आले असतानाच यावर गडकरिंनी अखेर स्पष्टीकरण दिले आहे. मला कुवतीपेक्षा जास्त मिळाले असून मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. नेहरुंच्या चांगल्या कामांचेही आपण अनुकरण केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटल आहे.

तीन राज्यांमध्ये भाजपाचा पराभव झाल्यानंतर अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित झाले. तीन राज्यांमधील पराभवाच्या दुसऱयाच दिवशी सोशल मीडियावर नितीन गडकरी हेच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत, अशा आशयाचे मेसेज व्हायरल झाले होते. नितीन गडकरी यांनी देखील ‘नेतृत्वाने पराभवाचीही जबाबदारी स्वीकारावी’, असे सूचक विधान केल्याने चर्चेत भर पडली.अखेर नितीन गडकरी यांनी या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. एक हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी भाष्य केले. माझ्या विधानांचा चुकीचा अर्थ काढला. मी जे विधानच केले नाही, ते माझ्या नावावर चालवण्यात आले. मी कोणत्याही स्पर्धेत नाही. मी माझ्या मनानुसार आयुष्य जगतो. मी कोणाच्या इशाऱयावर भाष्य करत नाही, असे त्यांनी सांगितले.