|Thursday, February 27, 2020
You are here: Home » मनोरंजन » मराठी जनांच्या स्वप्नपूर्तीसाठी आता ‘कोण होणार करोडपती’

मराठी जनांच्या स्वप्नपूर्तीसाठी आता ‘कोण होणार करोडपती’ 

नशिबावर सगळे काही निर्भर असते म्हणणाऱयांना आपले नशीब बदलण्याची सुवर्णसंधी सोनी मराठी देत आहे. हो, पण त्यासाठी फक्त तुमच्या ज्ञानाचे शस्त्र योग्यरित्या वापरण्याची गरज आहे. आपल्या बुद्धीच्या जोरावर सगळे काही शक्य आहे, याचेच प्रतीक देणारा कार्यक्रम म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. अमिताभ बच्चन यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून सोनी टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांची स्वप्नपूर्ती केली आहे. आता महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही आपल्या स्वप्नांचा महाल बांधता यावा यासाठी सोनी मराठी आता ‘कोण होणार करोडपती’चं नवे पर्व घेऊन येत आहे. कौन बनेगा करोडपतीच्या यशात सूत्रसंचालनाचा खूप मोठा महत्त्वाचा वाटा असतो. या पर्वाचा सूत्रसंचालक कोण असणार? दरवेळी वेगवेगळी थीम असणाऱया या कार्यक्रमाची मराठी थीम कोणती असणार? आणि स्पर्धकांच्या मदतीसाठी लाईफलाईन्स कोणत्या असणार? असे अनेक प्रश्न आता सगळय़ांच्या मनात आहेतच. या सगळय़ाच गोष्टी हळूहळू उलगडणार आहेत, लवकरच सोनी मराठीवर येणाऱया कोण होणार करोडपतीच्या नव्या पर्वात…

Related posts: