|Saturday, August 24, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘शिवा’चा म्युझिक, ट्रेलर लाँच

‘शिवा’चा म्युझिक, ट्रेलर लाँच 

‘शिवा’ एक युवा योद्धा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 15 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱया या सिनेमाचा म्युझिक आणि ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. अभिनेता सिद्धांत मोरे, गीतकार बाबासाहेब सौदागर तसेच चित्रपटातील इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ‘शिवा’ या सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न झाला. निर्माता डॉ. संजय मोरे म्हणाले, शिवा सिनेमाची निर्मिती जबाबदारीने केली आहे. बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील माझे आदर्श आर्नोल्ड, रॉक यांना पाहिले तर बॉडीबिल्डिंगप्रमाणे सिनेक्षेत्रातही त्यांची यशस्वी कारकीर्द ठरली आहे. त्यांना मिळालेले चाहत्यांचे प्रेम माझ्यासारख्या नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे, असे सिनेमातील अभिनेता सिद्धांत मोरे म्हणाला.

 तन्वी हेगडे, योगिता चव्हाण, मिलिंद गुणाजी, योगेश मेहेर, सुनील गोडबोले, प्रकाश धोत्रे, शोभना दांडगे, जीत मोरे, बाबासाहेब सौदागर आणि दक्षिणेतील सुपरस्टार कामराज ही कलाकार मंडळी सिनेमात दिसणार आहे. संगीत दिग्दर्शक आदित्य बेडेकर आणि गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी पाच गाणी दिली आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने गायक कैलाश खेर यांचं ‘प्रलय भयंकर’ हे मराठीत गायलेलं इन्स्पिरेशनल साँग ऐकण्याचा योग येणार आहे.