|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज, 5 हजार कोटींची वाढ होणार?

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज, 5 हजार कोटींची वाढ होणार? 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. यंदा निवडणुकांचे  वर्ष असल्याचे  डोळ्यासमोर ठेऊन मुंबईकरांना खुष करण्याचा प्रयत्न होण्याची चिन्हं आहेत. मागील वर्षीच्या वास्तवदर्शी अर्थसंकल्पानंतर यंदाच्या महापालिका अर्थसंकल्पात तब्बल 5 हजार कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षीचे  महापालिका बजेट 32 हजार 500 कोटींवर जाण्याचे संकेत आहेत.

 मागील वर्षीच्या 27 हजार कोटींच्या बजेटमधील केवळ 37% रक्कमच खर्च करण्यात महापालिका प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे मागील  वर्षी वास्तवदर्शी अर्थसंकल्प मांडून बजेट खर्च करुन दाखवू म्हणणारे  प्रशासन आता तोंडावर आपटले आहे. त्यामुळे यंदा जरी बजेट पाच हजार कोटींनी वाढले, तरी त्यातून मुंबईकरांना खरोखर हातात काय मिळणार हा प्रश्न आहे. देशाच्या आर्थिक राजधानीचे  शहर मुंबई.. एका छोट्या राज्याचे  बजेट जितके  असेल, तेवढे बजेट या एका शहराचे  आहे. म्हणूनच मुंबई महापालिकेला आशिया खंडातील श्रीमंत महापालिका म्हणतात. यंदा महापालिका अर्थसंकल्पात पाच हजार कोटींनी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षातील वास्तवदर्शी अर्थसंकल्पानंतर पुन्हा यावर्षी अर्थसंकल्पाचा आकडा फुगणार  2018-19 च्या अर्थसंकल्पात 27 हजार 251 कोटींची तरतूद करण्यात आली होती. या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे पाच हजार कोटी रुपयांची वाढ करुन अर्थसंकल्प 32 हजार 500 कोटींवर जाणार असल्याची माहिती मिळत  आहे.मागील  वर्षीच्या  27 हजार कोटींच्या बजेटमधील केवळ 37 टक्के रक्कम खर्च मुंबई महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातील निधी खर्चच केला जात नसल्याची टीका दरवर्षी नगरसेवकांकडून केली जात होती. त्यावर गेल्या वर्षी अर्थसंकल्पातील सर्व निधी खर्च केला जाईल, अशी घोषणा पालिका आयुक्तांनी केली होती. मात्र 37 टक्केच रक्कम खर्च करण्यास पालिका प्रशासनाला यश आले आहे.