|Thursday, May 23, 2019
You are here: Home » Top News » गुंड आबू खानला ड्रग तस्करीत मदत केल्याप्रकरणी पोलिसांचे निलंबन

गुंड आबू खानला ड्रग तस्करीत मदत केल्याप्रकरणी पोलिसांचे निलंबन 

ऑनलाईन टीम / नागपूर :

नागपूर शहर पोलिस दलातील चार पोलिस उपनिरीक्षक आणि दोघा पोलिस कर्मचाऱयांचे निलंबन करण्यात आले आहे. कुख्यात गुंड आबू खानला ड्रग विक्रीसाठी मदत केल्याचा या सहा जणांवर आरोप आहे.

साजिद मोवाल, शरद शिंपणे, निलेश पुरभे, मनोज ओरके अशी निलंबित पोलिस उपनिरीक्षकांची नावे आहेत, तर जयंता शेलोट आणि शाम मिश्रा अशी निलंबित पोलिस कर्मचाऱयांची नावे आहेत. गुंड आबू खानशी संपर्क ठेवून त्याला अंमली पदार्थाची तस्करी आणि अवैध विक्रीसाठी मदत केल्याचा पोलिसांवर आरोप आहे. विशेष म्हणजे जयंता शेलोट तर आबू खानसोबत पार्टीत नाचतानाचा व्हिडिओही समोर आला आहे. नागपूर पोलीस दलातील अधिकारी अंमली पदार्थाची तस्करीत गुंतलेल्या गुन्हेगाराच्या सतत संपर्कात होते, हे लाजिरवाणं तथ्य चौकशीत समोर आलं. त्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ही कारवाई केली. आबू खानच्या 1200 कॉल रेकॉर्ड्समधून अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे क्रमांक समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Related posts: