|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » 899 रूपयांत स्पाईसजेटचे उड्डाण

899 रूपयांत स्पाईसजेटचे उड्डाण 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

स्पाईसजेट कंपनीने ग्राहकांसाठी स्वस्तात विमानप्रवास योजना सुरू केली आहे. या योजनुसार देशांतर्गत प्रवास 1.75 रुपये प्रतिकिमी तर आंतरराष्ट्रीय विमानप्रवास 2.5 प्रतिकिमी ठेवण्यात आला आहे. पण, ठराविक कालावधीसाठीच ही ऑफर देण्यात आली आहे. देशांतर्गत मार्गांवर सुरुवातीचे भाडे किमान 899 रुपये ठेवण्यात आले आहे. तर, आंतरराष्ट्रीय महामार्गावरील प्रवास 3699 रुपयांपासून सुरू होत आहे. त्यामुळे शिवशाही बसच्या दरात विमानप्रवासाचा लाभ मिळणार आहे.

 

शिवशाही बसने प्रवास केल्यास प्रवाशांना जवळपास 1.60 पैसे प्रतिकिमी रुपये भाडे आकारले जाते. तर, स्पाईसजेटच्या या ऑफरनुसार 1.75 रुपये प्रतिकिमी भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे शिवशाहीच्या दरात विमानप्रवास करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे, असेच म्हणता येईल. स्पाईसजेटच्या या तिकीट बुकींगवर 10 टक्के अतिरिक्त कॅशबॅक ऑफरही देण्यात आली आहे. एसबीआय पेडिटकार्ड धारकांना या योजनेचा लाभ घेता येईल. मात्र, एसबीआयची ऑफर आणि अतिरिक्त लाभ घेण्यासाठी स्पाईसजेटच्या  www.spicejet.com या वेबसाईटवरुनच तिकीटाचे बुकींग करावे लागणार आहे. तर यात्री ADDON25  प्रोमो कोड चा वापर केल्यास प्रीफर्ड सीट, जेवण आणि स्पाईट मॅक्सवर 25 टक्क्मयांपर्यंत सूट मिळणार आहे. तसेच स्पाईसजेट मोबाईल ऍपच्या सहाय्याने बुकिंग केल्यास तिकीट दरांमध्ये 5 टक्के सवलत मिळेल. प्रवाशांना 5 टक्के ऑफरचा लाभ घेण्यासाठी ADDON30 हा प्रोमोकोड वापरावा लागणार आहे.