|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » स्कूलबसमध्ये गियरऐवजी बांबूचा वापर ; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

स्कूलबसमध्ये गियरऐवजी बांबूचा वापर ; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईतील सांताक्रूझ इथल्या पोदार इंग्लिश स्कूलच्या बसमध्ये गिअरऐवजी बांबू लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या बसने मंगळवारी (5 फेब्रुवारी) एका कारला धडक दिली. त्यानंतर हा प्रकार उजेडात आला. खाररोड पोलिसांनी या प्रकरणी बस चालकाला अटक केली आहे.

सांताक्रूझच्या पोदार एज्युकेशनल कॉम्पेक्सच्या स्कूल बसच्या चालकाने गिअरऐवजी बांबू लावून विद्यार्थ्यांचा जीव धोक्मयात घातला होता. या बस चालकाने मंगळवारी सकाळी खारमधील रहिवासी असलेल्या एका बिझनेसमनच्या बीएमडब्लू कारला मधू पार्क इथे धडक दिली. यानंतर बिझनेसमनने पाठलाग करुन बस थांबवली. यावेळी चालक राज कुमार (वय 21 वर्ष) गिअरऐवजी बांबू टाकल्याचे पाहिले. कायदा पायदळी तुडवल्याचे लक्षात आल्यानंतर बिझनेसमनने पोलिसांना फोन करुन याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्याला तातडीने अटक करण्यात आली. मात्र नंतर जामीनावर त्याची सुटकाही झाली. गिअर लिवरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्याऐवजी बांबूचा वापर केल्याची सारवासारव चालकाने केली. तसेच दुरुस्तीसाठी वेळ न मिळाल्याने तीन दिवस गिअरऐवजी बांबू वापरत असल्याचेही त्याने सांगितंले. याबाबत शाळेला माहिती दिली असून आवश्यक पावले उचलण्यास सांगितल्याची माहिती खार पोलिसांनी दिली आहे. दुसरीकडे पोलिसांनी पुढील कारवाईसाठी हे प्रकरण आरटीओकडे सोपवले आहे. बसमधील विद्यार्थी सुखरुप असल्याचे शाळेतर्फे सांगण्यात आले आहे. शाळा तसेच शाळा वाहतूक समिती या प्रकरणाचा तपास करत असून प्रशासनाला मदत करत आहे. सगळय़ा स्कूलबसचें लवकरच ऑडिट केले जाईल. या प्रकारची घटना पुन्हा होऊ नये यासाठी शाळा पुन्हा एकदा सगळय़ा कंत्राटी चालक आणि स्टाफला प्रशिक्षण देणार आहे, असेही शाळेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

Related posts: