|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » विमाननगर परिसरात सराईत गुन्हेगाराकडून जिवंत काडतुसासह गावठी पस्तुल हस्तागत

विमाननगर परिसरात सराईत गुन्हेगाराकडून जिवंत काडतुसासह गावठी पस्तुल हस्तागत 

ऑनलाईन टीम / पुणे:

विमाननगर परिसरात गस्त घालत असताना एका सराईत गुन्हेगाराकडून एक गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसं असा मुद्देमाल विमानतळ पोलिसांनी हस्तगत केला.तौसिफ यासिन शेख( वय 21 रा.मंहम्मदवाडी हडपसर) या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

पोलिस निरीक्षक दिलिप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी विमानतळ पोलिसांची गस्त सुरु होती. सी.सी.डी.चौक येथे तौसिफ शेख हा संशयास्पदपणे उभा होता.त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तुल व दोन काडतुसे हस्तगत करण्यात आली. पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे,गुन्हे निरीक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, पोलिस कर्मचारी अशोक आटोळे,विश्वनाथ गोणे,संजय आढारी,विशाल गाडे,राहूल मोरे, प्रशांत कापुरे,विनोद महाजन,पुष्पेंद्र चव्हाण,अजय विधाते यांच्या पथकाने ही कारवाई केली. तौसिफ हा हडपसर परिसारातील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत.