|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News » प्रा.विजय फातर्पेकर यांच्या ‘यक्षगान’ ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात रंगकर्मी चद्रकांत काळे यांचे प्रतिपादन

प्रा.विजय फातर्पेकर यांच्या ‘यक्षगान’ ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात रंगकर्मी चद्रकांत काळे यांचे प्रतिपादन 

ऑनलाईन टीम / कणकवली :

विजयकुमार फातर्पेकर यांच्या ‘यक्षगान’ लेखनामुळे लोककला संस्कृती भाषा भगिनींचा संवाद वाढीस लागेल. प्रा फातर्पेकर यांच्या ‘यक्षगान’ ग्रंथाचे मोल एवढे आहे की या ग्रंथामुळे आजही गुरुकुल पद्धतीने ‘यक्षगान’ सारखा कलाप्रकार कलाक्षेत्रात शिकविला जात आहे. याची माहिती सर्व वर्गापर्यंत पोहोचेल. असे प्रतिपादन विख्यात रंगकर्मी चंद्रकांत काळे यांनी पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘यक्षगान’ पुस्तक प्रकाशन समारंभात केले.

सिंधुदुर्गातील जे÷ लोककला अभ्यासक कानडी ‘यक्षगान’ लोककलेचे तसेच कोकणातील दशावताराचे संशोधक प्रा. फातर्पेकर लिखित आणि पुणे पद्मगंधा प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘यक्षगान’ ग्रंथाचे प्रकाशन पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे श्री काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी ‘यक्षगान’ मधील संगीत-नृत्य किती अर्थपूर्ण व कलात्मक आहे हे निव्वळ फातर्पेकर यांच्या यक्षगान लेखन परिश्रमामुळेच महाराष्ट्राला कळू शकेल असेही आग्रहाने सांगितले. प्रा.फातर्पेकर यांच्या बरोबरच ‘यक्षगान’ गुरु संजीव सुवर्णा, पद्मगंधाचे संचालक अरुण जाखडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला विविध कला क्षेत्रातील बहुसंख्येने लोककलेचे रसिक उपस्थित होते.

कलांचा व्यापार सुरू आहे गुरु सुवर्णा म्हणाल,s जगण्यासाठी माणसाला कला आवश्यक असते. मात्र आज कलांचा व्यापार सुरू आहे. भारतातील विख्यात साहित्यिक डॉ. शिवराम कारंत यांच्या मार्गदर्शनाखाली मी ‘यक्षगान’ शिकलो. ही कला आज मी जगातील 52 देशांमध्ये सादर केली आहे. या कलेवर मराठीत निवळ फातर्पेकर यांच्यामुळेच ग्रंथ प्रसिद्ध होत आहे.

जाखडे म्हणाले, चांगल्या विषयाच्या आणि चांगल्या लेखकाच्या शोधत आम्ही असतो. त्यातूनच ग्रंथावर निरामय प्रेम करणारे प्रा.फातर्पेकर कुटुंब आम्हाला भेटले. प्रा. फातर्पेकर यांना थोर साहित्यिक शिवराम कारंत यांचा 34 वर्ष सहवास लाभला. त्यातून त्यांचा ‘यक्षगान’चा अभ्यास झाला. आज यामुळेच हा ग्रंथ आकारास आला आहे .भाषा, धर्म, प्रांत, जात या सर्वाच्या पलीकडे ‘यक्षगान’ कथानकाचं महत्त्व आहे. यामुळे ‘यक्षगान’ ग्रंथ लोकसंस्कृतीच्या वाचकांच्या हाती देताना आनंदच होत आहे.

फातर्पेकर म्हणाले, कोकणातील दशावताराच्या प्रेमापोटी थिएटर कॅडॅमीच्या शिष्यवृत्तीतून 1984 साली उड्डपी येथे पोहोचलो आणि पुढे डॉ. कारंत यांची तेथे भेट झाली. त्यांचा दीर्घ सहवास लाभला आणि यातूनच ‘यक्षगान’ कलेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आज मी लिहिलेला या कलेचा ग्रंथ प्रकाशित होत आहे. याचा मला आनंद होतो.

Related posts: