|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » देशांतर्गत गॅस : 50 हजार कोटीची गुंतवणूक शक्य

देशांतर्गत गॅस : 50 हजार कोटीची गुंतवणूक शक्य 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

देशांर्गत 50 शहरांमध्ये सिटी गॅस आणि कमपेस्ट नॅचरल गॅस (सीएनजी) केंद्र उभारण्यात येणार आहेत. तर यात पाईपलाईन बसवण्यात येणार असून यासाठी जवळपास पेट्रोलियम ऍण्ड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड (पीएनजीआरबी) यांच्या सादर करण्यात आलेल्या अनुमानातून ही माहिती देण्यात आली आहे.

गॅस बोर्डाकडून शहर गॅस वितरण करण्यासाठी दहाव्या फेरीत 225 बोली लावण्यात आले होते. हे बोलीचे राऊड नुकतेच समाप्त झालेले आहेत. यातील टेक्निकल विभागातील बोली 7 ते 9 फेब्रुवारीमध्ये खुली होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. संबंधीत बोली जिकणाऱयाला महिन्याच्या शेवटपर्यत लायसन्स देण्यात येणार असल्याचे सागण्यात आले आहे.

पीएनजीआरबीकडून बोलीधारकांची ओळख सांगण्यात आली नाही. यांचा तपशील बोलीची स्पष्ट माहिती देण्यात आल्यावच उघड होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. बोलीधारकांना वितरण व गॅस जोडणीची उभारणी करण्यासाठी परवाना मिळाल्यानंतर मोठा फायदा होणार असून यासाठी जवळपास 50 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आतापर्यंत जवळपास 22 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील 174 जिल्हातील पाईप कुकिंग गॅस यांची विक्रि करण्यासाठी 86 परवाने देण्यात आले हेते.