|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » उद्योग » पन्नास टक्के वाहने इन्शुरन्स विम्या अभावी

पन्नास टक्के वाहने इन्शुरन्स विम्या अभावी 

सर्व वाहनांचा विमा केल्यास प्रिमियम अर्धा होऊ शकतोः जुनी वाहने विम्या शिवायच

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशांतर्गत रस्त्यावर धावणाऱया सर्व वाहनांचा विमा असतो असे नाही परंतु या सर्व वाहनांचा विमा उतरल्यास वाहनांचा प्रिमियम हा अर्धा होवू शकतो. कारण बहूतेक वाहनांचा रस्ते परिवहन मंत्रालयाला अधिकच्या वाहनासाठी तिसऱया पार्टीचा इन्शुरन्स करण्यासाठी पोलीसांना मदत घ्यावी लागते. प्रथमच सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाचे मुख्य सचिव आणि डीजीपी यांना सादर करण्यात आलेल्या परिवहन मंत्रालयाच्या आदेशाचे पालन करण्याचा आदेश देण्यात आले आहेत.

ग्रामीण भागात विमा करण्याची संख्या कमी

शहरांमध्ये वास्तव्य करणारी लोक जास्त करुन आपल्पा वाहनांचा विमा करताहेत. तर दुसऱया बाजूला ग्रामीण भागात हाच टक्का कमी असल्याचे नोंदवण्यात आले आहे. असाच ग्रामीण भागासह अन्य भागातील वाहनांचा 50 टक्के वाहन विना विम्याची असल्याची नोंद करण्यात आली असून नवीन चालक वाहनाचा विमा करत आहेत परंतु मागील पाच ते सात वर्ष जुनी वाहने विना विम्याची असल्याची माहिती देण्यात आली आहे.

थर्ड पार्टी विमा जरुर करावा

वाहन चालकाने आपल्या वाहनाचा कॉम्प्रिहेंसिव्ह विमा करुन ठेवावा. कारण एखाद्यावेळी वाहन चोरीला गेल्यास त्याची भरपाई मिळाली नसली तरी चालेल पण वाहनाचा अपघात झाल्यास त्यात जखमी होणाऱया व्यक्तीला त्याची भरपाई मिळण्याची सुविधा व्हावी अशी माहिती परिवहन मंत्रालयाने सादर केले आहेत.   

51 टक्क्यापर्यंत घट होऊ शकते प्रिमियममध्ये

वाहनाचा वर्ग          सध्याचा प्रिमियम       संभाव्य    कमी

1000 सीसीहून कमी……………… 1850… 1000     46 टक्के

1000 ते 1500 सीसी…………….. 2863… 1500     48 टक्के

1500हून अधिक….. 7890………. 4000… 49 टक्के

75सीसीहून कमी…. 472………… 250….. 41 टक्के

75ते 150सीसी…… 720………… 350….. 51 टक्के

150ते350सीसी….. 985………… 500….. 49 टक्के

350सीसीच्या वर            2323                1500    35 टक्के