|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » भाजपाच्या विजयाचा मेरू, आता कोणीही राखू शकणार नाही- अमित शाह

भाजपाच्या विजयाचा मेरू, आता कोणीही राखू शकणार नाही- अमित शाह 

ऑनलाईन टीम / पुणे :

भाजपच्या विजयाचा मेरु, आता कोणीही रोखू शकणार नाही, असा एल्गार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पुण्यात केला. विशेष म्हणजे अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यापैकी कोणीही शिवसेना किंवा युतीचा साधा उल्लेखही केला नाही.

भाजपच्या बैठकीत अमित शाहांनी महाराष्ट्रासाठी भाजपचे ‘मिशन 45’ मांडले. 45 पेक्षा कमी जागा मिळाल्या, तर त्याला विजय मानता येणार नाही. या 45 जागांमध्ये बारामतीचाही समावेश असेल, असे अमित शाह म्हणाले. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलतांना बारामतीसह 43 जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला होता. महाराष्ट्रात 45 जागा जिंकल्या तर केरळमध्येही भाजपची सत्ता असेल, असा विश्वासही शाहांनी व्यक्त केला. आसाम, त्रिपुरामध्ये भाजपची सत्ता येईल, असे कोणालाही स्वप्नातही वाटले नव्हते, असेही शाह म्हणाले. बूथ कार्यकर्ते हेच भाजपच्या विजयाचे रहस्य आहे. भाजप हा नेत्यांचा नाही, तर कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे सांगत अमित शाहांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवरही टीकास्त्र सोडले. अमित शाहांनी काँग्रेससह सर्व विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला. 2019 मध्ये‘ठगबंधन’ जिंकल्यास देश मागे जाईल, मात्र भाजप जिंकल्यास घराणेशाही, जातीवाद यांची सद्दी संपुष्टात येईल, असा विश्वासही शाहांनी व्यक्त केला.