|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मुरूड-दापोली-पुणे बसला महाडजवळ अपघात

मुरूड-दापोली-पुणे बसला महाडजवळ अपघात 

प्रतिनिधी/ महाड

महाड तालुक्यांतील रेवतळे गावाजवळच्या घाटांमध्ये शनिवारी सकाळी मुरूड-दापोली-पुणे या बसला अपघात होऊन सतरा प्रवासी जखमी झाले. एका अवघड वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली. मात्र रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला बस अडकल्याने मोठा अनर्थ टळला. शनिवारी  सकाळी सव्वा दहाच्या सुमाराला टोकवाडीजवळ हा अपघात झाला.

   सकाळी दापोली येथून पुणे पिंपरी चिंचवडला ही बस निघाली होती. ही बस रेवतळे घाटांतून उताराच्या रस्त्याने महाडकडे येत असताना चालक प्रभाकर गायकवाड याचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या बाजुला पलटी झाली. यावेळी ती एका झाडाला टेकल्याने अनर्थ टळला. अन्यथ बस दरीत कोसळण्याची भीती होती. बसमधील प्रवाशांच्या डोक्याला व पायाला दुखापत झाली आहे. अपघातानंतर रेवतळे मोहल्यांतील तरुणांनी जखमींना बसमधून बाहेर काढत रुग्णवाहीकेच्या मदतीने महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

 या अपघातात अक्षय सुबोध कासारे (23 दाभट, ता. मंडणगड), प्रभाकर राजाराम गायकवाड (चालक, 55 वालोकर वाडी, पिंपरी चिंचवड)s, उर्मिला लक्ष्मण बटावले (60 मुरुड ता.दापोली), शिल्पा शरद केळकर (64, पुणे), हेमलता संतोष मोरे (35, दापोली), सुनंदा मारुती तांबट (72 दाभोळ), मंगेश मारुती तांबट (53 दाभोळ), अंजुम अजिज सय्यद (44, दापोली), अशोक व्यंकटराव पवार (69 सेंडेघर ता. दापोली), चांदबी खान (75 महाबळेश्वर जि. सातारा), फौजीय तनवीर कोंडेकर (22, शिरवली ता. महाड), अशोक तुकाराम येरवणकर (62 दापोली), मिना चंद्रकांत कुसगावकर (58 दाभोळ), राधिका कृष्णा बेणेरे (62 मुरुड, दापोली), नारायण शंकर पवार (53 मुरुड, दापोली), चंद्रकांत लहू कुसगावकर (69, दाभोळ) शरद दामोदर केळकर (66, सदाशिव पेठ पुणे) हे जखमी आहेत.