|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » भाजपचे खासदार किर्ती आझाद काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

भाजपचे खासदार किर्ती आझाद काँग्रेसमध्ये प्रवेश करणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्लीः

माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार किर्ती आझाद येत्या 15 फेब्रुवारीला काँगेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारीला सकाळी काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यलयात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थित ते प्रवेश करतील.

किर्ती आझाद बिहारच्या दरभंगा मतदार संघातून भाजपकडून खासदार आहेत. दरभंगा मतदार संघातून त्यांनी सलग तीनदा विजय मिळवला आहे. किर्ती आझाद यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वित्त मंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली डीडीसीएमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. घोटाळय़ाचा आरोप केल्यानंतर भाजपने किर्ती आझाद यांना निलंबित केले होते. मागील काही दिवसांपासून आझाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर उघडपणे टीका करत आहेत. नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या मुद्याचा जाहीरनाम्यात समावेश करुन देशातील कोट्यवधी हिंदूंच्या भावनेशी खेळ केला आहे, असा आरोप किर्ती आझाद यांनी केला होता.