|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » रा.प.महामंडळाच्या नाटय़ स्पर्धेत ‘शबय’ प्रथम

रा.प.महामंडळाच्या नाटय़ स्पर्धेत ‘शबय’ प्रथम 

सातारा येथील आंतरविभागीय नाटय़स्पर्धा : 48 वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच सिंधुदुर्ग विभागाची हॅट्ट्रिक

कणकवली:

राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा केंद्रावर 5 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या 48 व्या आंतरविभागीय नाटय़ स्पर्धेत रा. प. सिंधुदुर्ग विभागाने सादर केलेल्या विजय चव्हाण लिखित व सुहास वरुणकर दिग्दर्शित ‘शबय’ या मालवणी नाटकाने प्रथक क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग विभागाने सलग तीन वर्षे ‘गावय’, ‘भावीण’ व आता ‘शबय’च्या रुपाने अंतिम फेरीत धडक मारली असून महामंडळाच्या 48 वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच अशी ‘हॅट्ट्रिक’ नोंदविली आहे.

‘शबय’ला मिळालेल्या पारितोषिकांमध्ये दिग्दर्शन-सुहास वरुणकर, नेपथ्य-उत्तम राऊळ, अनंत साप्ते, गोविंद खोचाडे, स्त्राr अभिनय-सौ. सुविधा कदम, पुरुष अभिनय-सुधीर घवाळी, प्रसाद लाड आदींना पारितोषिके मिळाली. नवोदित कलावंत श्रद्धा परब यांच्या ‘नली’ व डॉ. सौ. हर्षदा माळवदे (कळंगुटकर) यांच्या ‘शेवंता’ या भूमिकेचेही परीक्षक शेखर कुलकर्णी यांनी कौतूक केले. किशोर तांबट यांचे संगीत आहे.

नाटकाची निर्मिती विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी केली असून अभियंता आर. एल. कांबळे, यंत्र अभियंता अजित मांगलेकर यांनी सहाय्यक निर्मिती, तर कामगार अधिकारी प्रवीण पाटील व विभागीय कर्मचारी अधिकारी एल. आर. गोसावी हे सूत्रधार आहेत. विजय वालावलकर यांचे सहाय्य लाभले. नाटकात हरेश खवणेकर, किशोर निपाणीकर, गणपत घाणेकर, दत्ताराम कुळे, विनायक शेटये, प्रमोद तांबे, मारुती मेस्त्राr, विशाल ढेकणे, मयुर जांभवडेकर, दीपक कानसे, दिनेश गोगटे, प्रकाश वालावलकर, संतोष शिरकर, केदार पिंगुळकर यांचा समावेश आहे. या यशाबद्दल ‘शबय’च्या चमुचे विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी अभिनंदन केले.