|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सत्यशोधक व्याख्यानमाला 15 पासून

सत्यशोधक व्याख्यानमाला 15 पासून 

डॉ. उमेश बगाडे, उल्का महाजन, चोरमारे यांची व्याख्याने

कणकवली:

समता प्रतिष्ठान, सिंधुदुर्गतर्फे सत्यशोधक व्याख्यानमाला 2019 चे आयोजन 15 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे. सायंकाळी 6 ते 9 यावेळेत होणाऱया या व्याख्यानमालेचे उद्घाटन 15 फेब्रुवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. उमेश बगाडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर ज्ये÷ समाजसेविका उल्का महाजन, वरि÷ संपादक विजय चोरमारे यांची व्याख्याने आगामी दोन दिवसांत होणार आहेत. 

समता प्रतिष्ठानने गेली दोन वर्षे सामाजिक प्रश्नांचा वेध घेणाऱया सत्यशोधक व्याख्यानमालेचे यशस्वीपणे आयोजन केले आहे. यावर्षीचे हे तिसरे वर्ष असून 15 फेब्रुवारीच्या उद्घाटनपर व्याख्यानात ‘इतिहास विकृतीचे राजकारण आणि भारतीय लोकशाही’ या विषयावर डॉ. उमेश बगाडे मांडणी करतील. डॉ. बगाडे हे पाठय़पुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य असून मार्क्सवाद, फुलेवाद, आंबेडकरवाद समन्वयाचे भाष्यकार म्हणूनही ओळखले जातात. 16 फेब्रुवारीला विस्थापितांच्या लढाईच्या नेत्या ज्ये÷ समाजसेविका उल्का महाजन यांचे ‘राज्यसंस्था, विकास आणि जनतेचे उद्ध्वस्तीकरण’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. 17 फेब्रुवारीला  ज्येष्ठ संपादक विजय चोरमारे यांचे ‘शासनसंस्था, स्वातंत्र्य आणि माध्यमांची भूमिका’ या विषयावर समारोपाचे व्याख्यान होणार आहे.

व्याख्यानमालेला विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते आणि सत्यशोधक जनआंदोलन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष किशोर जाधव, पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी दत्ता धर्माजी गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. बुद्ध, मार्क्स, फुले, आंबेडकर यांच्या व्यवस्था परिवर्तक क्रांतिकारी तत्वज्ञानाचा विकसित वारसा घेऊन अब्राह्मणी प्रबोधन गतिमान करण्याची ही वेळ असून या व्याख्यानमालेत मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कांबळे यांनी केले आहे.