|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तुळजापूर रस्त्यावर पोलीस गोळीबारात तरुणाचा मृत्यू

तुळजापूर रस्त्यावर पोलीस गोळीबारात तरुणाचा मृत्यू 

पोलीस अधिकाऱयासह  तीन पोलीस जखमी

सोलापूर / प्रतिनिधी

 सोलापूर-तुळजापूर रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ रविवारी मध्यरात्री संशयीत चोरटा आणि तालुका पोलीस यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीत एक जण ठार झाला तर चोरटय़ांनी केलेल्या हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱयासह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. तर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी विशेष पोलीस अधिकारी नेमून या घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान रात्री उशिरा मृतदेह घेण्यास नातेवाईक तयार झाल्याचे समजते.

विनायक देविदास काळे (वय 30, रा. तळे हिप्परगा, ता. उत्तर सोलापूर) असे पोलीस हल्ल्यात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस कर्मचारी (बक्कल नंबर 900) विक्रम दराडे व (बक्कल नबंर 913) विकास फडतरे अशी दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

रविवारी मध्यरात्री पोलीस निरीक्षक पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी दराडे आणि फडतरे हे खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीता तुळजापूर सोलापूर रस्त्यावर निघाले होते. पहाटे तीनच्या सुमारास उळे गावाच्या परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ पांढऱया रंगाची कार संशयास्पद स्थितीत थांबलेली त्यांना दिसली. त्यावेळी पोलीस निरीक्षक पाटील व कर्मचाऱयांनी कारमधील लोकांना हटकले. रस्त्यावर थांबवण्याचे कारण विचारातच, त्याच्यात शा†िब्दक वाद सुरु झाला. त्यावेळी कारमधून उतरलेल्या दोघांची धरपकड केली, दरम्यान कारमधून उतरलेल्या पाच  ते सहा जणांनी पोलिसांवर तलवार आणि दगडाने हल्ला चढविला. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस कर्मचारी दराडे व फडतरे जखमी झाले. त्यावेळी दरोडेखोरांच्या हल्ल्यातून स्वत:चा बचाव करण्यासाठी पोलीस निरीक्षक पाटील यांनी रिव्हॉल्वरमधून दरोडेखोरांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात एक दरोडेखोर ठार झाला. या गोंधळात इतर पाच दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. यानंतर पहाटे 5.45 वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवडे यांनी दरोडेखोरास शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले. याबाबतची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.

या घटनेनंतर पोलीस निरीक्षक पाटील यांच्या हाताला आणि पायाला दगड लागला आहे तर पोलीस कर्मचारी फडतरे यांच्या कानाजवळ दगड व तलवारीने रक्तस्त्राव झाला आहे. त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी अश्विनी रुग्णालयात हलविले आहे. डिझेल चोरी करणारी टोळी असावी असा अंदाज पोलिसांकडून बांधला जात आहे. तालुका पोलीस ठाण्यात पोलिसांवर जीवघेणा केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. घटनास्थळी सकाळी 10 च्या सुमारास फॉरेन्सिक इन्विस्टीगेशनची व्हॅन हजर झाली होती. या व्हॅनच्या माध्यमातून काही धागेदोरे मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.