|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आदर्श शिंदेंच्या गायनाचा इस्लामपुरकरांनी लुटला आनंद

आदर्श शिंदेंच्या गायनाचा इस्लामपुरकरांनी लुटला आनंद 

आजोबा, वडीलांच्या गाण्यांना दिला उजाळा

प्रतिनिधी/ इस्लामपूर

इस्लामपूरकर कला रसिकांनी कडाक्याच्या थंडीतही युवा पार्श्वगायक आदर्श शिंदे यांच्या ’कडक’ गाण्यांचा मनमुराद आनंद लुटला.. कोंबडी पळाली, अरारा, नवीन पोपट हा, ’दुनियादारी’मधील देवा तुझ्या गाभाऱयास, ’ख्वाडा’ मधील तुझ्या रूपाच चांदणं, शिट्टी वाजली, डोकं फिरलया, आवाज वाढाव डीजे, चिमणी अशी एकापेक्षा एक बहारदार गाणी सादर करीत त्याने कार्यक्रमाची रंगत वाढविली. त्यांचे आजोबा प्रल्हाद शिंदे यांची प्रसिद्ध कव्वाली ’एक दिन पंची उड जाएगा रहेगा पिंजरा खाली’, व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  यांच्या ’माझी मैना गावावर राहिली ग’ या गाण्यांना रसिकांनी जोरदार प्रतिसाद दिला.

    आविष्कार कल्चरल ग्रुपने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 17वा संगीत महोत्सवात ’आदर्श शिंदें’चा ’लाईव्ह इन कॉन्सर्ट’उत्साहात पार पडला. आदर्शने आपल्या आजोबांच्या तू सुखकर्ता, पार्वतीच्या बाळा, ताशाचा आवाज, मोरया, अंबे कृपा करी आदी गाण्यांनी सुरुवात केली. यानंतर त्याने ’जय मल्हार मालिके’चे टायटल  सॉंग सदानंदाचा येळकोट, वडील आनंद शिंदेंचे पेटले आभाळ रे अशी अनेक गाणी सादर केली. मी महाराष्ट्रात फिरतो, मात्र असा रसिक वर्ग मी प्रथम पाहतोय. आपण माझा सन्मान तर केलाच, शिवाय सर्व प्रकारच्या गाण्यांचा आनंद घेतला असा शेरा त्याने शेवटी मारला. स्वप्नील गोडबोले, अमित पगारे, आरोही म्हात्रे या सहकलाकारांनी सुरुवात, मध्यंतर, तसेच आदर्शबरोबर द्वंद्वव गीते सादर केली

   प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मुंबईचे जेष्ठ नेते सुहेल लोखंडवाला यांच्या होते. तर दीप प्रज्वलन युवा नेते प्रतिक पाटील, राजवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा.कृष्णा मंडले यांनी आविष्कारच्या वाटचालीचा आढावा मांडला. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते आदर्श शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. सौ.शैलजादेवी जयंतराव पाटील यांच्या आवाहनाप्रमाणे कला रसिकांनी उभा राहून टाळ्यांच्या गजरात आदर्श शिंदेंचा सन्मान केला. यावेळी राजवर्धन पाटील, सारंग पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचा विनायक पाटील, बाळासाहेब पाटील, खंडेराव जाधव, संग्राम पाटील, संजय पाटील, विराज शिंदे, कृष्णात पिंगळे, सर्जेराव यादव, सुनील कुशिरे, एस.डी.कोरडे, विकास कर्डिले, विकास राजमाने यांच्यासह सहा हजार स्त्राr-पुरुष,व युवक कला रसिकांनी आनंद लुटला.