|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पोलीस निरीक्षक साळोखेंच्या बदली रद्दसाठी आज शहर बंद

पोलीस निरीक्षक साळोखेंच्या बदली रद्दसाठी आज शहर बंद 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे यांची बदली रद्द करावी, अशी मागणी इस्लामपूर शहर राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे करण्यात आली आहे. बदली रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सोमवारी शहरात बंद पाळणार आहे, या बंदमध्ये व्यापारी, व व्यावसायीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी केली आहे.

    शहरातील गुन्हेगारीला साळोखे यांनी कमी कालावधीत कायद्याचा बडगा दाखवून आळा बसवला आहे. त्यांनी कार्यभार स्विकारलेपासून शहरातील वाहतुक व्यवस्था, अल्पवयीन विद्यार्थ्यांची वाहन चालवण्याबाबत शिस्त लावणे. तसेच शहरातील विविध ठिकाणी मुलींना त्रास देणाऱया चौकाचौकातील टोळ्यांना खाकी वर्दीचा हिसका दाखवला आहे.

   अलिकडच्या काळात त्यांनी शहरातील नागरिक व्यापाऱयांना त्रास देणाऱया टोळ्यांची शहरातून धिंड काढून गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न केला आहे.  त्यामुळे त्यांची बदली रद्द करावी, त्यासाठी इस्लामपूर शहर बंदचे आवाहन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, ऍड.चिमण डांगे, नगरसेवक खंडेराव जाधव, महिला राष्ट्रवादी काँग्रेसेच्या अध्यक्षा रोझाताई किणीकर, राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेलचे गोपाळ नागे, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटने अध्यक्ष जुबेर खाटीक, इस्लामपूर शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शामसुंदर पाटील, सर्व हॉटेल व्यावसायिक, कापड व्यापारी, सराफ व्यापारी, असोसिएशनचे सर्व खोकी संघटना आदींनी ही या बंदला समर्थन दिले आहे.