|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आदर्श पोलीस अधिकाऱयांचा सत्कार हीच त्यांची लोकप्रियता

आदर्श पोलीस अधिकाऱयांचा सत्कार हीच त्यांची लोकप्रियता 

प्रतिनिधी/ मोरजी

पोलीस सेवेतून चांगली सेवा करून गावकर यांनी समाजासमोर आणि पोलीस खात्यात आदर्श घालून दिल्यामुळेच त्यांचा सत्कार त्यांच्या गावात होतो ही पोलीस खात्याला स्वाभिमानाची गोष्ट आहे असे सांगून पोलीस आहे कायदा आहे ,आणि कोर्ट आहे अन्याय करणाऱया शिक्षा होते का हे प्रश्न उपस्थित होत आहे तुम्ही बदलणार नाही तर कोण बदलणार, आता बदलणार नाही तर कधी बदलणार, पुढच्या पिढीसाठी समृद्ध समाज घडवूया, असे प्रतिपादन माजी निवृत महाराष्ट्र पोलीस आयजीपी सुरेश खोपडे यांनी माजी पोलस अधीक्षक उमेश गावकर यांच्या सत्कार सोहळय़ाला प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले.

मांदे दिनदयाळ सभागृहात आयोजित केलेल्या सत्कार सोहळय़ाला अध्यक्षस्थानी जेष्ट पत्रकार संदेश प्रभुदेसाई, आयोजन समितीचे अध्यक्ष प्रदीप हडफडकर, सत्कार मूर्ती उमेश गावकर व सौ. उषा गावकर आदी उपस्थित होते .

स्वागत व सूत्रसंचालन प्रा.विठोबा बगळी यांनी तर वकील अमित सावंत यांनी परिचय केला. नाना सोपटे केरकर, गोविंद आजगावकर, शांताराम हडफडकर, तारा हडफडकर, संतोष बर्डे आदींनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .

या वेळी सत्कार समारंभा निमित्ताने खर्च करून उललेले रोख एक लाख रुपये आयोजन समितीने गौरवमूर्ती उमेश गावकर यांच्याकडे सुपूर्द केली ,त्यावेळी सत्कारमूर्ती गावकर यांनी ही देणगी लोकहितासाठी वापरण्यात यावी यासाठी त्यात आपण काही रक्कम अधिक करून ती योग्य निर्णय घेऊन समितीने लोकाभिमुख कामासाठी खर्ची घालण्याचे आवाहन केले .

सत्कारमूर्तीला मानपत्र देण्यात आले त्याचे वाचन दयानंद मांदेकार यांनी केले .

सत्कार सोहळय़ाला प्रेक्षकांत मस्ज मुख्यमंत्री प्रा,लक्ष्मीकांत,माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप ,माजी आमदार दयानंद सोपटे ,माजी आमदार परशुराम कोतकर ,बाबी बागकर ,सचिन परब ,जित आरोलकर ,जिल्हा सदस्य अरुण बानकर ,दीपक कलांगुटकर ,श्रीमती मांजरेकर ,अरविंद भाटिकर ,प्रशांती तळपणकर ,माजी पोलीस उपअधीक्षक आपण तेली ,के,जी ,देसाई अनेक मान्यवर प्रति÷ित व्यक्ती उपस्थित होत्या .

महाराष्ट्र् पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी आपल्या सविस्तर भाषणात आपल्याला जे कडू व चांगले अनुभव पोलीस खात्यात काम करताना आले त्याची सविस्तर माहिती दिली .

      माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी सत्कारमूर्ती गावकर यांना शुभेच्छा देताना आदर्श व्यक्तीचा हा सत्कार असून,निष्कलंकीत व्यक्ती आहे ,आपण आंदोलनात सहभागी झालो त्यावेळी आपल्याला आमदार नसताना गावकर यांनी उचलून नेल्याचे आठवण करून दिली ,सर्वांकडे निस्वार्थी भावनेने संबंध ठेवणाऱया व्यक्तींची खरी गरज असल्याचे सांगून गावकर यांनी एखादे चांगले ,शैक्षणिक ,सामाजिक किंवा सांस्कृतिक माध्यमाचा वापर करून समाज सेवा करण्याचे आवाहन केले .

       जे÷ पत्रकार संदेश प्रभुदेसाई यांनी बोलताना हा वेगळा सत्कार आहे  आजी माजी मंत्री मुख्यमंत्री आमदार ,राजकर्ते हे व्यसपीठाखाली आणि पोलीस अधिकारी निवृत्त होऊनही ते व्यासपीठावर त्यावरून त्यांची लोकप्रियता लक्षात येते असे असांगून निश्वार्थी भावनेने काम केल्यामुळे त्यांनी आदर्श निर्माण केला आहे ,उमेश यांनी पोलीस अधिकारी होऊनही शेत सोडले नाही ,कलांगुट म्हापसा असताना त्यांनी ड्रग्सच्या विरोधात कांवकेले त्याला तोड नसल्याचे त्यांनी सांगितले ,गावकर हे धार्मिक व धर्मांध आहेत .

सत्कारमूर्ती उमेश गावकर यांनी सत्काराला उत्तर देताना आपण या सत्काराने आपण भारावून गेलो आहे कसे आभार मानायचे कळतं नाही हा सत्कार एक आदर्श सत्कार असल्याचे सांगून हा मानबिंदू व मनाचा तुरा असल्याचे सांगितले .आपणास पेडणेचासार्थ अभिमान वाटतो असे सांगितले  घेतलेले परिश्रम व आईवडिलांनी केलेले संस्कार कामी आल्याचे ते म्हणाले .

पाहुण्यांना स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले .

शेवटी पूजा परब यांनी पसायदान सादरकेले ,निवृत्ती शिरोडकर यांनी आभार मानल