|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शिवपुतळय़ाचा आगमन सोहळा उत्साहात

शिवपुतळय़ाचा आगमन सोहळा उत्साहात 

अष्टे येथे आज शिवपुतळय़ाची मिरवणूक

वार्ताहर/ सांबरा

अष्टे (ता. बेळगाव) येथे नवक्रांती युवा संघटना व ग्रामस्थांच्यावतीने उभारण्यात येणाऱया छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारुढ पुतळय़ाचा आगमन सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय शिवाजी, जय भवानी’ आदी घोषणा देत तसेच ढोल व टाळ-मृदंगाच्या गजरात आगमन सोहळय़ाला शहरातील धर्मवीर संभाजी चौकातून प्रारंभ करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महांतेश कवटगीमठ, महापौर बसवराज चिक्कलदिनी, उपमहापौर मधुश्री पुजारी, आमदार अनिल बेनके, अरविंद कारची, यल्लाप्पा ताशिलदार, बाळकृष्ण तोपिनकट्टी आदी उपस्थित होते. प्रारंभी भरमा धामणेकर यांनी स्वागत केले. तर नवक्रांती युवा संघटनेचे अध्यक्ष कल्लाप्पा पाटील यांनी प्रास्ताविक केले.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते धर्मवीर संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारुढ पुतळय़ाचे पूजन झाल्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी अरविंद कारची यांनी फीत कापून आगमन सोहळय़ाचा शुभारंभ केला. या सोहळय़ात पारंपरिक वेशभूषा परिधान करून तरुण व महिला सहभागी झाल्या होत्या. तर भगवे फेटे व भगवे ध्वज यामुळे अवघा परिसर भगवामय झाला होता. झांजपथक, ढोलपथक व वारकऱयांचे भजनी मंडळही सोहळय़ात सहभागी झाले होते. आगमन सोहळय़ाची मिरवणूक धर्मवीर संभाजी चौकातून कॉलेज रोड, कित्तूर चन्नम्मा सर्कल, आरटीओ सर्कल, किल्ला तलाव, महांतेशनगर मार्गे अष्टे गावाकडे निघाली. यावेळी मिरवणुकीचे ठिकठिकाणी आरती ओवाळून स्वागत करण्यात आले.

आगमन सोहळय़ाच्या शुभारंभप्रसंगी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, राजू बाबुगावडे, ग्रा. पं. अध्यक्षा लक्ष्मी पाटील, उपाध्यक्ष यल्लाप्पा बुड्री, गंगाराम शिरोले, अरविंद भातकांडे, बाबू पाटील, बाळू धामणेकर, अरुण लाड, शिवाजी कित्तूर, बाळकृष्ण धामणेकर, देमाणी पाटील, आप्पय्या झाजरी, सिद्धाप्पा भडगावी, विनोद लाड, श्रीकांत शुभांजी, शामराव कित्तूर आदी शिवप्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन पुंडलिक कुंडेकर यांनी केले.