|Saturday, February 23, 2019
You are here: Home » Top News » राज्यात थंडीचा कडाका कायम , हवामान खात्याचा गारपीटीचा अंदाज

राज्यात थंडीचा कडाका कायम , हवामान खात्याचा गारपीटीचा अंदाज 

ऑनलाईन टीम / धुळे :

सध्या राज्यात थंडीचा कडाका वाढला असून धुळे जिल्हात तापमानाचा पारा 3.4 अंश सेल्सयिसपर्यंत पोहोचला आहे. तसेच ही थंडी काही पिकांसाठी लाभदायी असल्याचं जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र हवामान खात्याने येत्या दोन दिवसात गारपीटीचा अंदाज वर्तवला आहे.

 मागील काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात हुडहुडी वाढली आहे. अनेक जिल्ह्यात तापमान 10 अंश सेल्सयिसच्या खाली पारा गेला आहे. धुळय़ातही पारा 3.4 अंशावर स्थिरावला आहे. जिल्ह्यात परतलेली थंडी काढणीला आलेला गहू , हरभरा या पिकांसाठी तसेच आंबा पिकांच्या मोहरांसाठी लाभदायी असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत.

धुळे जिल्हय़ात मागील 10 दिवसांपासून थंडीचा कहर पाहायला मिळतोय. 9 फेब्रुवारी रोजी तर तापमानाचा पारा 2.5 अंश सेल्सयिसपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे उबदार कपडय़ाच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. तसेच थंडी कमी झाली म्हणून बांधून ठेवण्यात आलेल्या गरम कपडय़ांना पुन्हा बाहेर काढण्याची वेळ धुळेकरांवर आली आहे. धुळय़ात दिवसभर गारठा राहत असल्याने कमाल तापमानात देखील घट झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा हा प्रभाव पुढील काही दिवस कायम राहणार आहे. तसेच येत्या दोन दिवसात उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आल्याने शेतकऱयांची चिंता वाढली आहे.

 

Related posts: