|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » वर्ध्याच्या बजेटला 48 कोटींची कात्री

वर्ध्याच्या बजेटला 48 कोटींची कात्री 

ऑनलाईन टीम / वर्धा :

राज्याच्या तिजोरीचा भार सांभाळणारे वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री व राज्याचे वित्त नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्धा जिल्हय़ाच्या वार्षिक नियोजन योजनेत यंदा 48 कोटी रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासकामांवर याचा मोठा परिणाम होणार आहे.

राज्याचे वित्त नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या जिल्हय़ाच्या विकासाला त्यांनी मागील साडेचार वर्षांत कधीही निधी कमी पडू दिला नाही. सेवाग्राम, पवनार, विकास आराखड्यात अनेक गावांना निधी दिला. मात्र, 2019-20 च्या नियोजनात 48 कोटींची कपात करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने 272 कोटी रुपयांची मागणी शासनाच्या वित्त विभागाकडे केली होती. त्यापैकी 107 कोटी रुपयेच मंजूर करण्यात आले. गेल्या वषीच्या तुलनेत 48 कोटी रुपये कमी मिळणार आहेत. त्यामुळे यंदा विकासकामांना कात्री लागणार आहे. 2018-19 मध्ये सर्वसाधरण योजनेत 155 कोटी 64 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. शासनाकडून प्राप्त निधीपैकी 75 कोटी 16 लाखां® निधी वितरित करण्यात आला. त्यातील 49 कोटी 90 लाख 99 हजार खर्च झाले, तर अनुसूचित जाती उपयोजनांमध्ये 13 कोटी 81 लाख 31 हजार रुपये खर्च झाले. आदिवासी उपयोजना व क्षेत्रबाह्य योजना यामध्ये 11 कोटी 92 लाख 25 हजार रुपये खर्च झाले. मात्र, यंदा केवळ 107 कोटी रुपयेच मिळाल्याने निवडणुकीच्या वर्षात विकासावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.