|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ऍमेझॉनकडूनही युपीआय सुविधा सुरू

ऍमेझॉनकडूनही युपीआय सुविधा सुरू 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पेटीएम आणि फोनपेला टक्कर देण्यासाठी ऍमेझाँन या ई-कॉमर्स कंपनीने भारतात स्वतःची यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) सुविधा सुरु केली आहे. ऍक्ससि बँकेशी संलग्न असलेली ही सुविध सुरु करण्यात आली आहे. ही सुविध ऍमेझाँन ऍप्लकेशनवर मिळणार आहे.

 

ही सुविध सुरु करण्यासाठी यूजर्सना त्यांच्या बँक खात्याला यूपीआय ऍपशी लिक करावे लागणार आहे. यानंतर पेटीएम, फोनपे या ऍप्सप्रमाणे पैसे पाठवू आणि प्राप्त करु शकतात. यूपीआय सर्व्हिसमध्ये बँक खाते क्रमांक आणि बँक आयएफएससी कोडची गरज लागत नाही. फक्त व्हर्च्यूअल पेमेंट ऍडेसच्या साहाय्याने कुठेही पैसे पाठवता येतात. बँकेत पैसे पाठवण्यासाठी किंवा काढण्यासाठी रंग लावावी लागत होती, सोबत अधिक वेळही खर्च व्हायचा. मात्र अशाप्रकारच्या ऍप्लीकेशनमुळे बँकेतील रांगा कमी होण्यास मदत होत आहे. सोबत वेळही वाचत आहे. त्यामुळे सध्या या  ऍप्लीकेशनचा वापर पैसे पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी मोठ्याप्रमाणात होत आहे. सरकारकडून डिजीटल इंडिया करण्यासाठी भीम ऍप्लकेशन सुरु करण्यात आले होते ज्यामुळे अनेकांना त्याचा फायदा झाला होता. शिवाय गुगलपेसारखे ऍप्लीकेशन सा मोठ्याप्रमाणात वापरले जात आहे. अशात आता ऍमोझाँन या ई-कॉमर्स कंपनीनेही ही सुविध सुरु केली आहे. शिवाय व्हॉट्सऍप पण यूपीआय सुविध सुरु करणार असल्याची माहिती आहे.