|Thursday, June 20, 2019
You are here: Home » Top News » स्कूल बस अपघातात 19 विद्यार्थी जखमी

स्कूल बस अपघातात 19 विद्यार्थी जखमी 

ऑनलाईन टीम / पालघर :

पालघर येथील सर जे. पी. इंटरनॅशनल स्कूलच्या बसला माहीमजवळील पाणेरी नदीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 19 विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यातील चार विद्यार्थी आणि बसचालक गंभीर जखमी आहेत. चालकाचे नियंत्रण सुटून बस झाडावर आदळली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. सर जे. पी. इंटरनॅशनल स्कूलची बस विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात होती. त्याचवेळी हा भीषण अपघात झाला.

या अपघातात 4 विद्यार्थी आणि चालक गंभीर जखमी झाले असून, 15 विद्यार्थी किरकोळ जखमी आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दोन विद्यार्थ्यांना ढवळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळली, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे. काही महिन्यांपूर्वी याच शाळेची एक सहा चाकी बस 25 किलोमीटरपर्यंत 5 चाकांवर धवली होती. मात्र, त्या घटनेकडे शाळा व्यवस्थापनानं दुर्लक्ष केले, असा आरोप पालकांनी केला होता.