|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » मानधन नको वेतन हवे, अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन

मानधन नको वेतन हवे, अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर :

मानधन नको वेतन हवे या मागणीसाठी आज अंगणवाडी कृती समितीच्या वतीने कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर जेलभरो आंदोलन करण्यात आलं. मागील अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका मानधनावर काम करत आहेत. मात्र शासनाने राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना मानधनाऐवजी वेतन द्यावे, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते.

   त्याचबरोबर मोदी सरकारने 2018 मध्ये सेविकांना 1500 रुपये आणि मदतनीस यांना 750 रुपये देण्यात येतील, अशी घोषणा केली होती. परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांची दिशाभूल त्वरित थांबवावी, अशी मागणी अंगणवाडी कृती समितीच्या वतीने आज करण्यात आली. प्रमुख पाच मागण्यासाठी राज्यभरातील सर्व अंगणवाडी सेविकांनी आजपासून तीन दिवस महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शिवाय आज राज्यभर जेलभरो आंदोलनही करण्यात आले आहे. या आंदोलनात 200 हून अधिक महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी सरकार आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.पंकजा मुंडे यांना कृती समितीच्या वतीने अनेकवेळा निवेदन देण्यात आले आहे. आमची त्यांच्या सोबत बैठक झाली तेव्हापासून ते टाळाटाळ करत आहेत, असे कृती समितीकडून सांगण्यात आले.