|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » शेतकऱयांना मिळणार हवामानावर आधरित फळपिक विमा

शेतकऱयांना मिळणार हवामानावर आधरित फळपिक विमा 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

राज्यात निवडक फळपिकांसाठी हवामानावर आधरित विमा योजना राबवण्यात येणार आहे. पंतप्रधन फळपीक विमा योजना या अंतर्गत फळपिक विमा देण्यात येणार असल्याची माहिती आहे. या योजनेत शासनाने निर्देशित केलेल्या हवामान केंद्रात नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱयांना परस्पर नुकसान भरपाई दिली जाणार आहे.  

 मागील दोन महिन्यात काही ठिकाणी तापमान खूप खाली गेले होते. त्यामुळे काही पिकांच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. या परिस्थितीत फळपीकनिहाय तापमान ठराविक मर्यादेच्या कमी झाल्यास त्या फळपिकासाठी निश्चित करण्यात आलेल्या हवामानाच्या धोक्यानुसार शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळणार आहे.