|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर बेरोजगारीचा बकासूर माजणार ; राष्ट्रवादीचा निशाणा

मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर बेरोजगारीचा बकासूर माजणार ; राष्ट्रवादीचा निशाणा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भाजपा समर्थकांनी नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधन व्हावेत यासाठी #ComeAgainModiji हा ट्वटिर टेंड सुरु केला आहे. याच ट्वटिर टेडवर राष्ट्रवादीने ट्वटिरच्या माध्यमातूनच निशाणा साधला आहे. मोदी पुन्हा पंतप्रधन झाले तर बेरोजगारीचा बकासूर माजेल असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. यासाठी राष्ट्रवादीने एका व्यंगचित्राची मदत घेतली आहे.

या व्यंगचित्रात एक भलामोठा राक्षस दाखवण्यात आला आहे. हा राक्षस जनतेला तुडवतो आहे असे दाखवण्यात आले आहे.मोदी पंतप्रधन झाले तर महागाई, बेरोजगारी, शेतकऱयांच्या वाढत्या आत्महत्या या समस्या वाढतील असेही या ट्वटिमध्ये म्हटले आहे. बेरोजगारीचा बकासूर तरूणाईला तुडवतोय असे दाखवण्यात आले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी ज्याप्रमाणे सोशल मीडियाचा प्रभावी वापर भाजपाकडून करण्यात आला होता. आता तसाच वापर राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येतो आहे. तसेच काँग्रेसकडूनही करण्यात येतो आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत या निवडणुकांमध्ये भाजपा विरूद्ध काँग्रेस अशीच लढाई आहे. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपाला लक्ष्या करण्यास सुरुवात केली आहे.