|Saturday, April 20, 2019
You are here: Home » leadingnews » पंतप्रधान मोदीं लुटीला प्रोत्साहन देत आहेत : राहुल गांधी

पंतप्रधान मोदीं लुटीला प्रोत्साहन देत आहेत : राहुल गांधी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राफेल विमान खरेदी व्यवहारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा तोफ डागली. ‘प्रत्येक संरक्षण करारात भ्रष्टाचारविरोधी अटी-शर्ती असतात. पण पंतप्रधान मोदींनी राफेल करारातील अटी व शर्ती वगळल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. पंतप्रधान मोदी हेच लुटीला प्रोत्साहन देत आहेत हे यावरून स्पष्ट होते,’ असे राहुल म्हणाले.

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी चंद्राबाबू नायडू हे दिल्लीतील आंध्र भवनात उपोषणाला बसले आहेत. त्यांना विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. ममता बॅनर्जी यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. राहुल गांधी यांनीही आंध्र भवनमध्ये जाऊन नायडूंची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. मी आंध्र प्रदेशातील नागरिकांच्या सोबत आहे. हे पंतप्रधान कसे आहेत? त्यांनी आंध्र प्रदेशच्या नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. मोदी जिथे जातात, तिथे खोटे बोलतात. आता त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे, असे राहुल म्हणाले. दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही नायडू यांची भेट घेतली.

 

Related posts: