|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » Top News » लज्जास्पद! महिलेचा 9 वर्षीय पुतण्यावर बलात्कार

लज्जास्पद! महिलेचा 9 वर्षीय पुतण्यावर बलात्कार 

ऑनलाईन टीम / मलप्पुरम :

केरळमध्ये नऊ वर्षांच्या मुलावर त्याच्या 36 वर्षीय काकीनेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाने केलेल्या आरोपानंतर तेनिपलम पोलिसांनी महिलेविरोधत गुन्हा नोंदवला आहे. पीडित मुलाने ही बाब स्थानिक रुग्णालयातील डॉक्टरेंना सांगितल्यानंतर हा प्रकार उजेडात आला.

डॉक्टरने या घटनेबाबत चाइल्डलाइन संस्थेला माहिती दिली. त्यांनी मुलाचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांत तक्रार दिली. ’पीडित मुलाचं एका वर्षाहून अधिक काळ लैंगिक शोषण करण्यात आले. या प्रकारामुळे मुलाच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला आहे. आरोपी महिला ही त्याची काकी असून, त्याच्या शेजारीच राहते, अशी माहिती चाइल्डलाइनचे (मलप्पुरम) समन्वयक के. अन्वर यांनी दिली. चाइल्डलाइनने दिलेल्या तक्रारीनंतर आम्ही महिलेविरोधत गुन्हा नोंदवला आहे. पीडित मुलाचे कुटुंबीय आणि आरोपी महिलेच्या कुटुंबामध्ये वाद होता. या वादातून हा आरोप करण्यात आला आहे का, याचा तपास आम्ही करत आहोत. या प्रकरणी लवकरच आरोपी महिलेचा जबाब नोंदवून घेऊ, असे पोलीस उपनिरीक्षक बीनू थॉमस यांनी सांगितले.