|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » Top News » भारताचा माजी क्रिकेटपटू अमित भंडारीवर जीवघेणा हल्ला

भारताचा माजी क्रिकेटपटू अमित भंडारीवर जीवघेणा हल्ला 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताचा माजी जलदगती गोलंदाज आणि डीडीसीए वरि÷ निवड समितीचा अध्यक्ष अमित भंडारीवर सोमवारी अंडर 23 टीमच्या चाचणीदरम्यान अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. भंडारीच्या डोक्यावर आणि कानाला जखम झाली आहे.

 भंडारीवर हल्ला होताच त्याचे सहकारी सुखविंदर सिंह यांनी त्याला रुग्णालयात नेले. हल्लेखोरांची गय करणार नाही असे दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघाचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी म्हटले आहे. शर्मा म्हणाले, ’राष्ट्रीय अंडर 23 टूर्नामेंटच्या संभाव्य खेळाडूंमध्ये समावेश न झालेल्या एका खेळाडूने हा हल्ला केला असल्याची शक्मयता आहे.’ घडलेल्या घटनेची माहिती देताना अंडर 23 चे व्यवस्थापक शंकर सैनी म्हणाले, ’मी तंबूत जेवत होतो. भंडारी आणि अन्य एक निवड सदस्य व सिनिअर टीमचे कोच मिथुन मन्हास ट्रायल मॅच पहात होते. दोन लोक आले आणि भंडारी यांच्याजवळ गेले. त्यांची भंडारींसोबत शाब्दकि चकमक झडली. ते निघून गेले. त्यानंतर 15 जण हॉकी स्टीक्स, लोखंडी सळया, सायकलच्या साखळय़ा घेऊन आले. चाचणीत सहभागी झालेली मुले आणि आम्ही भंडारींना वाचवायला धवलो. पण आम्हाला धमकावले की मध्ये पडल्यास गोळी मारू. त्यांनी नंतर भंडारींना हॉकी स्टीक आणि लोखंडी सळय़ांनी मारले’.