|Saturday, August 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » युती-आघाडीचे काय होणार ?

युती-आघाडीचे काय होणार ? 

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता देशात राजकीय वातावरण चांगलेच तापण्यास सुरुवात झाली आहे. मार्चच्या पहिल्या आठवडय़ात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. त्या अनुषंगाने भाजपने पुन्हा केंद्रात आपले सरकार कसे येईल यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे राज्यातील दौरे वाढले असून पुण्यात नुकत्याच झालेल्या भाजपच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीसह 43 जागा जिंकण्याचे वक्तव्य केले. उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या दुसऱया क्रमांकाच्या जागा असलेल्या महाराष्ट्रातून 2014 मधून शिवसेना-भाजपने युतीद्वारे 42 खासदार निवडून आणले होते. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ प्रतिमेचा भाजप वापर करण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत आहे. एकीकडे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मोदींच्याविरोधात अप्रत्यक्ष टीका करत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याची तयारी करू लागलेत.

शिवसेना आणि भाजपची युती होणार की नाही हे प्रश्नचिन्हच असून नुकतीच कोकणातील नाणार रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली असता ठाकरे यांनी युतीची बोलणी होणार असतील तर आधी नाणार प्रकल्पासाठीची भूसंपादनाची अधिसूचना रद्द करा, मगच बोलणी करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे एकीकडे शिवसेना भाजपबरोबर युती करणार असे दिसत असले तरी मात्र गेल्या साडेचार वर्षात शिवसेनेने ज्याप्रकारे भाजपवर जोरदार आरोप करताना थेट पंतप्रधानांवर आरोप करताना ‘चौकीदार चोर है’ अशी भाषा केली. तसेच ‘युती गेली खड्डय़ात’ अशी अनेकदा वक्तव्य केल्याने जर शिवसेनेने भाजपशी निवडणूकपूर्व युती केली तर शिवसेनेच्या भूमिकेबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यातच शिवसेनेचे अनेक खासदारांनी भाजपसोबत जर युती झाली तरच आम्ही निवडून येऊ शकतो. स्वबळावर निवडून येणे शक्य नसल्याचे उद्धव ठाकरेंना सांगितले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी युतीबाबत ठोस भूमिका जाहीर करण्याचे टाळले आहे.

तर दुसरीकडे भाजपने स्वबळावर लढण्याचे अस्पष्ट संकेत देताना राज्यात बारामतीसह 43 जागा जिंकण्याचे वक्तव्य केले. एकीकडे शिवसेनेला गोंजारताना भाजपने दुसरीकडे आपली स्वबळाची तयारी सुरू केल्याची चर्चा केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यानुसार, ‘साथ में आये तो जितेंगे नही, तो पटक देंगे’ अशी भाषा केल्यानंतर ठाकरे यांनी शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला यायचाय असे उत्तर दिले होते. शिवसेना भाजपला

ज्याप्रकारे प्रत्युत्तर देत आहे ते पाहता 2014 मध्ये ज्याप्रकारे भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जागा वाटपाची चर्चा चालू ठेवत ऐनवेळी शिवसेनेसोबतची युती तोडण्याची घेषणा केली. त्याचा वचपा शिवसेना त्याचप्रकारे या लोकसभा निवडणुकीत काढू शकते, अशी शक्यता नाकारता येत नाही. कारण जर आधीच स्वबळाची भाषा केली तर शिवसेनेचे जे विद्यमान खासदार आहेत ते भाजपच्या तंबूत दाखल होऊन तेथून लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिवसेनेला आपले खासदार फुटण्याची भीती आहे. तर दुसरीकडे भाजप युती न झाल्यास सेनेच्या खासदारांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्याच्या तयारीतच आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्याचा सपाटाच लावला असून मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर राज्यातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर राज्यातील दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी केंद्राकडून निधी आणला तर दुसरीकडे शेतकऱयांना दरमहा 500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. सरकारकडून सध्या जोरदार घोषणा केल्या जात आहेत तर दुसरीकडे शिवसेना-भाजपची युती होणार का ? नाही हे प्रश्नचिन्ह असल्याने भाजपच्या मित्रपक्षांची भूमिका अवलंबून आहे.

नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाशी युती झाली तर काय भूमिका घेणार आणि युती नाही झाली तर भाजपच्या सोबत जाणार का ? तसेच रामदास आठवले यांनी दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढविण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. राणे आणि आठवले हे दोघे भाजपच्या कोटय़ातून राज्यसभेवर खासदार आहेत. जर युती झाली नाही तर राणे यांचे पुत्र शिवसेनेकडे असणाऱया रत्नागिरी-सिंधुदुर्ग तर आठवले दक्षिण मुंबईतून लढायचे म्हटले तर विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांची अडचण होऊ शकते. त्यामुळे युतीवर या दोन मित्रपक्षांचे राजकारण अवलंबून आहे. तर दुसरीकडे मनसेला काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीत घेणार का नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचा मनसेला आघाडीत घेण्यास विरोध असला तरी राष्ट्रवादी मनसेला आघाडीत घेण्यासाठी आग्रही असल्याचे बघायला मिळते. छगन भुजबळ यांनी विदर्भात बोलताना मनसे आघाडीत असली तरी निवडणूक मैदानात नसणार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे कधी नव्हे ती राज्यातील राजकीय समीकरणे या लोकसभा निवडणुकीच्या वेळी बघायला मिळतील. जर युती न झाल्यास शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री फडणवीस हे 28 फेब्रुवारीला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील. त्यानंतर विधानसभा विसर्जित झाल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका राज्यात एकत्र घेण्यात येतील अशी शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत काय होणार हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

काँग्रेस-राष्ट्रवादीची युती झाली असली तरी काही जागांबाबत मतभेद असून माढा लोकसभा कोण लढणार यावर निर्णय व्हायचा आहे. राष्ट्रवादी विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट देणार असल्याची चर्चा होती. मात्र, माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहितापाटील आणि निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हे दोघेही इच्छुक असल्याने त्यातच शरद पवार पुन्हा माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तर मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे तर शिवसेना आणि भाजप एकमेकांच्याविरोधात लढली तर नवनवीन अचंबित करणारी नावे उमेदवार म्हणून समोर येऊ शकतात. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय, पार्थ पवार, निलेश राणे, रोहित पवार, विश्वजित कदम अशा राजकीय पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा घराणेशाही समोर आली आहे. सेना-भाजपातील कलगीतुरा सुरूच असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात बारामतीसह 43 जागा जिंकणार असल्याचा जो निर्धार व्यक्त केला होता. त्यावर सेनेने आपल्या मुखपत्रातून सडकून टीका केली आहे.

भाजप राज्यातच काय देशात आणि अमेरिकेतही ईव्हीएमच्या जोरावर कमळ फुलवू शकते, अशी टीका केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांची घोषणा व्हायला काही दिवस शिल्लक असताना शिवसेनेकडून शेवटच्या क्षणी भाजपवर अशा पद्धतीने टीका करणे, त्यातच प्रियंका गांधींच्या राजकीय प्रवेशावर सेना नेत्यांनी स्वागत करणे तर कधी मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल तर त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल असे वक्तव्य करणे यावरुन शिवसेना सध्यातरी भाजपसोबत जाणार नसल्याचा अंदाज वर्तवता येत आहे. 2017 च्या जानेवारीतच बाळासाहेबांच्या जयंतीदिनी उध्दव यांनी यापुढे सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर झालेल्या सर्व निवडणुका ठाकरे यांनी स्वबळावर लढविल्या आहेत. त्यामुळे आता ठाकरे यांनी जर युतीची भाषा केली तर त्यांनी केलेल्या स्बवळाच्या भाषेवरुन पुन्हा शिवसेनेच्या भूमिकेबाबत सवाल उपस्थित केला जाऊ शकतो. त्यामुळे शिवसेना स्वबळावरच लढणार असल्याचे सध्यातरी त्यांच्या राजकीय हालचालीवरुन जाणवत असून युती झाली तरी त्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल, असे वाटत नाही. 31 जानेवारी ही यापूर्वी शिवसेनेला युतीच्या निर्णयाबाबत अमित शहा यांनी डेडलाईन दिली होती. आता फेब्रुवारीचे 15 दिवस झाले तरी अद्याप युतीबाबत सेनेकडून काहीच हालचाली होत नसल्याचे बघायला मिळत आहे. गेली 30 वर्षे शिवसेना आणि भाजपने लोकसभा निवडणुका युती म्हणून लढविल्या, अपवाद पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा आता 30 वर्षांनतर सेना-भाजप एकत्र लढणार की स्वबळावर हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

डॉ. मनस्वी कामत