|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » उद्योग » ‘हरुन इंडिया’च्या यादीत अव्वल स्थानी मुकेश अंबानी

‘हरुन इंडिया’च्या यादीत अव्वल स्थानी मुकेश अंबानी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हरुन इंडिया फिलांथ्रोपी (परोपकारी) च्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी अव्वल स्थानी असल्याचे समोर आले आहे. नुकतीच ही यादी प्रसिद्ध करण्यात आली असून ऑक्टोबर 2017 ते सप्टेंबर 2018 च्या दरम्यान अंबानी यांनी 437 कोटींचे दान दिले आहे.

मुकेश अंबानी यांच्यानंतर या यादीत पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचे नाव आहे. त्यांनी सुमारे 200 कोटींचे दान केले आहे. 1 ऑक्टोबर 2017 ते 30 सप्टेंबर 2018 या कालावधीत 10 कोटी व त्याहून अधिक दान केलेल्या दानशुरांची यादी हरुण रिसर्च इन्स्टिटय़ूटने तयार केली आहे. यामध्ये एकूण 1 हजार 560 कोटींचे दान दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यात 39 भारतीय दानशुरांचा समावेश आहे. सर्वात अधिक शिक्षणक्षेत्राला दान देण्यात आले आहे. त्यानंतर आरोग्य आणि ग्रामीण भागातील विकासाला दान देण्यात आले आहे.

रिलायन्स फौंडेशनच्या माध्यमातून अंबानी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटीचा निधी (सीएसआर) हा देतात. त्यांची बार्कलेज हरुन इंडिया 2018 च्या यादीत सर्वात श्रीमंत भारतीय म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांची संपत्ती 31 जुलै 2018 अखेर 3.71 लाख कोटी रुपये इतकी आहे.