|Sunday, October 20, 2019
You are here: Home » उद्योग » गूगल मॅप्समध्ये उपलब्ध होणार ‘एआर’ नॅव्हिगेशन!

गूगल मॅप्समध्ये उपलब्ध होणार ‘एआर’ नॅव्हिगेशन! 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गूगलकडून एआर (ऑग्मेटेड रिऍलिटी) आधारित मॅप नॅव्हिगेशन उपलब्ध होणार आहे. यामुळे 2 डी मॅप ऐवजी आता ज्याप्रमाणे गेम्समध्ये दिशा दाखविण्यात येतात तशाप्रकारे यामध्ये अनुभव मिळणार आहे. व्हिज्युअल पोझिसिंग सिस्टीम या तंत्रज्ञानाचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. ज्यामध्ये जीपीएस शिवाय फोनचा पॅमेरा आणि गूगलचा डेटा याची सांगड घालून आपल्या सभोवतालची योग्य माहिती तपासून अचूक ठिकाण दाखवले जाणार आहे. त्यामुळे पुलाजवळील रस्त्याने जाताना वरून जावं की बाजूच्या रस्त्याने जावे, असे बरेच प्रश्न अचूक दिशेने दिसणाऱया थ्रीडी बाणामुळे सुटणार आहेत.  

या सुविधेसाठी नवीन सार्ट एआर पर्याय असून ज्याद्वारे नेहमीचा मॅप खालच्या बाजूस जातो आणि वरती आपल्या पॅमेराला दिसणारी दृश्ये समोर येतील. त्यानंतर पॅमेरा दृश्यावर बाण, नाव आणि वळणासंबंधी माहिती उपलब्ध होईल. याचबरोबर बॅटरी वाचावी या दृष्टीनेसुद्धा काही पर्याय पाहायला मिळणार आहेत. ही सुविधा केव्हापासून उपलब्ध होणार याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, वॉल स्ट्रर्ट जर्नलने याबाबतचा डेमो व्हिडिओ प्रसारित केला आहे.