|Sunday, October 20, 2019
You are here: Home » उद्योग » स्टेट बँकेकडून गृहकर्ज स्वस्त

स्टेट बँकेकडून गृहकर्ज स्वस्त 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने रेपो दर 6.5 टक्क्यांमध्ये घट करून 6.25 टक्के केला आहे. या कपातीमुळे भारतीय स्टेट बँकेने 30 लाख रुपयांपर्यतच्या गृहकर्जावरील व्याज दर 0.05 टक्क्यांनी कमी केला आहे. त्यामुळे एसबीआयचे गृह कर्ज स्वस्त झाले आहे. लघु आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांच्या फायद्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बँकेने म्हटले आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असल्यामुळे ग्राहकांचे हित पाहाणे गरजेचे आहे. गृह कर्जामध्ये एसबीआयचा वाटा सर्वाधिक आहे. यामुळे आम्ही केंद्रीय बँकेच्या दरातील कपातीचा लाभ लघु आणि मध्यम उत्पन्न गटाला उपलब्ध करून देणार आहोत, असे एसबीआय बँकेचे चेअरमन रजनीश कुमार यांनी सांगितले. 30 सप्टेंबर 2018 पर्यंत बँकेकडे 28.07 लाख कोटी रुपये इतकी शिल्लक जमा आहे. बाजारातील गृह कर्जापैकी एसबीआयचा हिस्सा 34.28 टक्के तसेच वाहन कर्ज 34.27 टक्के आहे.