|Thursday, April 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शारदा घोटाळा चौकशीच्या देखरेखीस न्यायालयाचा नकार

शारदा घोटाळा चौकशीच्या देखरेखीस न्यायालयाचा नकार 

नवी दिल्ली

 पश्चिम बंगालमधील शारदा चिटफंड घोटाळय़ाप्रकरणी सुरू असलेल्या सीबीआय चौकशीच्या देखरेखीस सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने अनेक गुंतवणुकदारांची याबाबतची मागणी फेटाळली आहे. चिटफंड घोटाळय़ाच्या चौकशीवर नजर ठेवण्यासाठी देखरेख समिती स्थापन करण्यास इच्छुक नसल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2013 मध्ये चिटफंड घोटाळय़ांची चौकशी सीबीआयला सोपविली होती. तसेच न्यायालयाने 5 फेब्रुवारी रोजी कोलाकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआयसमोर हजर राहण्याचा तसेच चौकशीत सहकार्य करण्याचा आदेश दिला होता. पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व कुमार यांनी केले होते. 

Related posts: