|Thursday, June 20, 2019
You are here: Home » क्रिडा » अन् चेंडू दिंडाच्या कपाळावर आदळला!

अन् चेंडू दिंडाच्या कपाळावर आदळला! 

कोलकाता / वृत्तसंस्था

बंगालचा मध्यमगती गोलंदाज अशोक दिंडाला चेंडू कपाळावर आदळल्याने दुखापत झाली. आपल्याच गोलंदाजीवर परतीचा झेल टिपत असताना चेंडू हातातून सुटला व त्याच्या कपाळावर आदळला. ईडन गार्डन्सवर टी-20 सराव सामन्यादरम्यान ही घटना घडली. फलंदाज बिरेंदर विवेक सिंगने स्ट्रेट ड्राईव्ह लगावल्यानंतर दिंडा येथे झेल टिपण्याच्या प्रयत्नात होता. चेंडू कपाळावर आदळताच तो वेदनेने मैदानावरच कोसळला आणि तातडीने वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आले. सुदैवाने दुखापतीचे स्वरुप फारसे गांभीर्याचे नव्हते आणि दिंडाने मैदानाबाहेर जाण्यापूर्वी आपले षटकही पूर्ण केले. तरीही डॉक्टरांनी त्याला दोन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

मागील दशकभरापासून अशोक दिंडा बंगालच्या प्रथमश्रेणी संघाचा अविभाज्य घटक रहात आला असून त्याने 2010 ते 2013 या कालावधीत भारतीय संघातर्फे 13 वनडे व 9 टी-20 सामने खेळले आहेत. 2011 मुश्ताक अली चॅम्पियन्स बंगालचा संघ दि. 21 फेब्रुवारी रोजी मिझोरामविरुद्ध आपल्या टी-20 मोहिमेला प्रारंभ करणार आहे. मागील हंगामात त्यांना सुपर लीग ब गटात तिसऱया स्थानी समाधान मानावे लागले व यामुळे अंतिम सामन्यात खेळण्याची त्यांची संधी हुकली होती