|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आज रंगणार पर्यावरण बालनाटय़ महोत्सव

आज रंगणार पर्यावरण बालनाटय़ महोत्सव 

कोल्हापूर

       इकोफोक्स व्हेंचर्स, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रतिज्ञा नाटय़रंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय माध्यमिक पर्यावरण बालनाटय़ महोत्सव 12 रोजी कै. राम गणेश गडकरी सभागृह, कोल्हापूर येथे होत आहे.

       विद्यार्थी दशेतच मुला-मुलींमद्ये पर्यावरण रक्षणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, अंगभूत अभिनय कलेला योग्य दिशा मिळावी या उद्देशाने हा महोत्सव आयोजित केला जातो. माध्यमिक शाळांना तसेच शिक्षकांना पर्यावरणपर लेखन, दिग्दर्शनास प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून या वर्षी लेखन, दिग्दर्शन, सांघिक सर्वोत्कृष्ठ बालनाटय़ यांसाठी रोख पारितोषिके देण्यात येत आहेत. सदर महोत्सवाचे उद्घाटन सकाळी 8:45 वाजता होणार आहे.

      या महोत्सवात एम. एल. जी. हायस्कूल, उषाराजे हायस्कूल, ल. कृ. जरग विद्यामंदिर, विद्यापीठ हायस्कूल, सेवेन्थ डे स्कूल, दादासो मगदूम हायस्कूल, आदर्श गुरुकुल विद्यालय, ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल, आम. सुरेश खाडे इं. मि. स्कूल, न्यू जनरेशन इनोव्हेटिव्ह स्कूल, राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा, अभिनव प्राथ. शाळा, संजीवन विद्यालय, संजीवन पब्लिक स्कूल, देशभूषण हायस्कूल, आनंदराव पाटील प्रशाला, आदर्श विद्यालय, ज्योतिर्लिंग हायस्कूल, सिम्बॉयसेस स्कूल, माध्यमिक विद्यालय, साईदिशा अकॅडमी, एम. आर. पाटील विद्यानिकेतन, साईदिशा पब्लिक स्कूल या शहरी आणि ग्रामीण शाळांचा सहभागी होत आहेत.