|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » हुपरीकरांना नियमित पाणी देण्याच्या वचनपूर्तीकडे वाटचाल

हुपरीकरांना नियमित पाणी देण्याच्या वचनपूर्तीकडे वाटचाल 

नगराध्यक्षा सौ.जयश्री महावीर गाट

वार्ताहर/ हुपरी

चंदेरी नगरी हुपरीच्या महिलां वर्षांनुवर्षे पाण्यासाठी वणवण फिरताना , उन्हा तान्हात पाण्यासाठी फिरताना सोसावी लागणारी  झळ व मला आलेला अनुभव याची जाणीव लक्षात घेवुन या महिलांच्या करिता व  नागरिकांना दररोज पाणी देण्याचे स्वप्न मनाशी बाळगले आहे .ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. त्याचाच एक भाग  म्हणून माळभागाला नविन जलकुंभातून पाणीपुरवठा सुरु करीत आहोत असे प्रतिपादन हुपरीच्या प्रथम नगराध्यक्षा सौ. जयश्री महावीर गाट यांनी केले.

हुपरी (ता .हातकणंगले )येथील योजनेच्या माध्यमातून पूर्णत्वास जात असलेल्या हुपरी करांच्या  महत्त्वाकांक्षी पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलकुंभाच्या चाचणीच्या प्रसंगी बोलत होत्या.

हुपरी नगरपरिषद पाणीपुरवठा विभागामार्फत हुपरीच्या पाणी योजनेतील नव्या जलकुंभातून सध्या अस्तित्वात असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे    माळभागावरील शाहूनगर, शिवाजीनगर, 94 प्लॉट, होळकरनगर, भुमीहिन वसाहत, चांदीनगर या भागांमध्ये पाणीपुरवठा करुन यशस्वी चाचणी घेणेत आली.यापुढे या भागात पुरेशा दाबाने व नियमित पाणीपुरवठा होणार आहे. जुन्या जलकुंभापेक्षा नविन जलकुंभ अधिक उंचीवर असून पाणी साठवण क्षमताही जादा असलेने पाणीपुरवठा 5 ते 6 दिवसांच्या टप्प्यावरून 2 दिवसांच्या टप्प्यावर आणण्यात येणार  आहे. तसेच या भागात पाणीपुरवठयाची वेळही सकाळी 6 ते सायंकाळी 6 अशी राहणार आहे.

माता भगीनींची रात्री अपरात्री पाण्यासाठी होणारी वणवण दूर करणार… हे भाजपा नेते महावीर गाट  यांनी एक वर्षापूर्वी वचन दिले होते. हे वचन पूर्णत्वास येत असून सदर पाणी योजनेचे काम गतीने पूर्ण करणार असलेचे हुपरी नगरीच्या प्रथम नगराध्यक्षा सौ जयश्री महावीर गाट यांनी सांगितले.

श्री अंबाबाई देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठयात नगराध्यक्षा यांच्या सूचनेनूसार सूधारणा करण्याकामी मुख्याधिकारी तानाजी नरळे, पाणीपुरवठा विभाग प्रमुख प्रसाद पाटील यांचे नियोजन, कर्मचारी वर्गाचे  अपार कष्ट , उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे, सभापती सुरज बेडगे,सर्व नगरसेवक/नगरसेविका यांच्या सहकार्याने कामास गती प्राप्त झाल्याचे  सांगितले.